भिगवण : पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा भीमा नदीवरील डिकसळ ( ता.इंदापुर) ते कोंढार चिंचोली ( ता.करमाळा) या दोन गावाच्या दरम्यान असणारा ब्रिटिश कालीन पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी ( दि.११) लोखंडी बॅरिकेटर्स लावून बंद केला होता. परंतु, अवघ्या चार दिवसात अज्ञातांनी शुक्रवारी ( दि. १४) रात्री लोखंडी बॅरिकेटर गॅस कटरच्या साह्याने कापून काढून रस्ता खुला केला. त्यामुळे दै. नवराष्ट्रने ‘हा रस्ता लवकरच खुला केला होईल’, असे भाकीत केले होते ते खरे झाले आहे.
-ऊस- वाळू माफियांचे कृत्य ?
दरम्यान, हा रस्ता चोरून खुला करण्यामागे ऊस माफिया किंवा वाळू माफिया यांच्याच हात असावा असा अंदाज परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत तसेच हे बॅरीकेट साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस वाहतुकीच्या उद्देशाने तोडण्याचा प्रकार झाल्या असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून बॅरीकेटर्स पुन्हा बसवण्याची मागणी कोंढार चिंचोली येथील माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी केली आहे.
[blockquote content=”बॅरीकेटर्स काढण्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी पाहणी केली असता जेसीबी व गॅस कटरने काढल्याचे निदर्शनास आले. उपअभियंता के. एम. उबाळे यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. वरिष्ठ गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेतील. त्यानंतर पुन्हा बॅरीकेटर्स बसवण्यात येणार आहे. ” pic=”” name=”-सुनीलकुमार वाघ, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, करमाळा. “]






