HMPV
बीड : मानवी मेटान्यूमोवायरस अर्थात एचएमपीव्ही या विषाणूने चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याचे दिसून आले. तसेच कोरोनासारख्या परिस्थितीची पुन्हा वेळ येते की काय अशी चिंता सतावत असताना आता भारतातही काही राज्यात या विषाणूचे रुग्ण आढळल्याचे दिसताच राज्यातील आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आल्याचे दिसते आहे.
हेदेखील वाचा : HMPV Virus : HMPV व्हायरसबाबत मोठी अपडेट; या काळात जन्मलेल्या मुलांना अधिक धोका
बीड जिल्ह्यातील नागरिकांनी या विषाणूबाबत घाबरण्याचे काही कारण नाही. आम्ही जिल्ह्यात सर्वे करत आहोत. जर रुग्णांची संख्या वाढली तर याचा सामना करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य केंद्र तयारी आहे, असे बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नागरिकांनी आजारावरून घाबरून जाण्याचे काही कारण नाही आणि हा सर्वसाधारण शोषणाचा आजार आहे. हे आजारी रुग्णांच्या संपर्कामुळे इतर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे खोकताना, शिंकताना तोंडाला रुमाल बांधणे, सॅनिटायजरने हात धुणे, ताप, खोकला, शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावे. भरपूर पाणी पिणे या सूचना करून हस्तांदोलन, रुमालचा पुनर्वापर, डोळे, नाक, तोंड, याला वारंवार हात न लावणे या गोष्टी टाळण्याचे आवाहन डॉ. थोरात यांनी केले आहे.
चार वर्षांपूर्वी कोरोनासारख्या विषाणूने जगभरात थैमान घातले होते. सलग दोन वर्ष लॉकडाउन सारख्या समस्येला सामोरे जावे लागले होते तर अनेकांना यात जीव गमवावा लागला होता. त्यामुळे आता अशाच प्रकारचा विषाणू सध्या आला असल्याचे म्हटले जात आहे. पुन्हा कोरोना सारखी परिस्थिती तर येणार नाही ना? असा भीतीयुक्त प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे.
राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांना या उद्भवणाऱ्या संसर्गबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये सर्दी, खोकलाच्या रुग्णाची तपासणी गतिमान करून नियमित अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
हेदेखील वाचा : BMC Elections: उद्धव ठाकरेंविरुद्ध BJP ची मोठी खेळी, महायुतीशी हातमिळवणी करणार राज ठाकरे; आशिष शेलारांनी घेतली भेट