गुणरत्न सदावर्तेंच्या टार्गेटवर सुरेश धस, 'त्या' खुनाच्या प्रकरणात थेट नाव घेतलं, म्हणाले...
बीड : धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना झालेल्या घोटाळ्यांच्या पुराव्याबाबतचा पेन ड्राईव्ह आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला. यावेळी पवारांनी तक्रार करा, असे सांगताच धस यांनी तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, बैठक संपल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी पेन ड्राईव्ह दिला नाही, काही विषय झाला नाही, असे सांगत प्रकरणावर पूर्णविराम दिला.
हेदेखील वाचा : Dhananjay Munde : भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी; महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्रींनी मांडली स्पष्ट भूमिका
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. पालकमंत्री झाल्यावर अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, खासदार रजनी पाटील, आमदार प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित, विक्रम काळे आदी उपस्थित होते.
सर्वांनी जबाबदाऱ्या नेटाने पार पाडाव्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी अधिकारी वर्गाने सादर केलेले विविध विषय समजून घेतले. जिल्हा पातळीवरील नागरी समस्या, सुरक्षा आणि इतर विविध मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
पेन ड्राईव्हचे 78 कोटी रूपयांच्या निधीशी कनेक्शन
बैठकीमध्ये आमदार सुरेश धस यांनी सर्वांसमोर अजित पवारांकडे एक पेन ड्राईव्ह दिल्यानंतर यासोबत लेखी तक्रारही करा, असे उपमुख्यमंत्री पवार मोठ्या आवाजाने बोलताच सभागृहात पसरली. या पेन ड्राइव्हचे कनेक्शन धनंजय मुंडे आणि 78 कोटी रुपयांच्या निधीशी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
आपण आता मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत जाणार असल्याचेही स्पष्ट केले. मी मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटीला जात आहे. मी त्यांची काल व परवाही भेट घेतली. कुठेतरी समस्या सुटली पाहिजे, अशी माझी भावना आहे. सरकारचा मनोज जरांगेंशी संवाद सुरू आहे, असेही आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
बिंदू नामावली या मुद्यांवर अजूनही ठाम
बिंदू नामावली या मुद्यावर आजही कायम आहे. अजित पवारांच्याही कानावर ही गोष्ट गेली आहे. जिल्ह्यात जे अतिरिक्त लोक झालेत, जे लोक करुणा मुंडे यांच्या गाडीत शस्त्र ठेवतात. अवैध धंदे करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परळीमधील काही पोलिस चुकीचे वागले. त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत. गुंडांच्या टोळ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
मी आरोप करताच 500 लोक कोमात
याप्रकरणी राज्याचे सचिव किवा उपसचिव दर्जाचा अधिकारी नेमला जाईल. सरकारने यापूर्वीच 5 कोटींचे बील डबल उचलल्याचे सांगितले. 73 कोटींचा आकडा 78 कोटींवर पोहोचला आहे. मी स्टेटमेंट केल्यापासून 500 लोक कोमात गेले आहेत, असे धस यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एकाची लोखंडी सळईने वार करुन हत्या; दारू पाजण्याच्या बहाण्याने नेलं अन्…