नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : नुकताच सगळीकडे दिवाळीचा सण जल्लोषात साजरा केला गेला. कुठे रांगोळीची आरास तर कुठे फटाक्यांचा धुमधडाका सुरू होता. हिंदू धर्मियांच्या प्रत्येक घरात विविध दिवे लावून हा सण साजरा केला गेला. मात्र, नवी मुंबईतील कोळीवाड्यात बहिरीनाथाच्या उत्सवानिमित्त एक आगळी-वेगळी दिवाळी साजरी केली गेली.. बहिरीनाथच्या उत्सवानिमित्त गुलाल उधळून व लाखों रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी करून साजरी केली गेली. यातील वेगळेपण असे की ही फटाके सर्वसाधारणपणे न उडवता, हाताने एकमेकांच्या अंगावर टाकून उडवले गेले. शेकडोंच्या गर्दीत ही फटाके कसेही, कोणत्याही पद्धतीने उडवले जात होते.या आगळ्या वेगळ्या फटाक्यांच्या आतषबाजीला सोशल मीडियावर देखील तितकीच लोकप्रियता लाभलेली पाहायला मिळाली.
बेलापूर किल्ला व ठाणे खाडी यांच्या कुशीत वसलेल्या दिवाळे कोळीवाड्यात दरवर्षी, दिवाळीनिमित्त श्री बहिरीनाथ देवाचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. तर, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील लाखों भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. तर, तीन दिवस साजरा होणारा हा सोहळा संपूर्ण कोळीसमाजात मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने जपला जातो. विशेष म्हणजे दिवाळे कोळीवाड्याच्या नावातचं दिवाळी हे नाव लपलंय म्हणूनच कीं काय तर, इतर ठिकाणी साजरा होणाऱ्या दिवाळी सणापेक्षा समुद्रातून वर्षातून एकदा येणाऱ्या बहिरीनाथाच्या आगमनाने दिवाळीची सुरुवात होते. इतरांसाठी महिनाभर पुरणारा फटाक्यांचा साठा या उत्सवासात संपतो.
साधारण 50 लाखांहून अधिक किंमतीचे फटाके अवघ्या या दोन दिवसात एका विशिष्ट पद्धतीने उडवले गेले. एखादा फटका उडवताना चटका बसेल, भाजेल या भीतीने कोणतीही त्याच्या आजुबाजूला फिरकत नाही. कटर दिवाळे गावातील फटाक्यांचा उत्सव मात्र वेगळाच असतो हे या उत्सवातून पहायला मिळाले. प्रचंड गर्दी असलेल्या मोकळ्या ठिकाणी एकाबाजूला गुलाल उधळत होते. तर कोणी बँड बजावून नाचत होते. या सर्व उत्साहात फटाके देखील तितक्याच शेकडोंच्या संख्येने उडवले जात होते. चहू बाजूने लोकवस्तीने वेढलेल्या लहानशा मैदानात रॉकेट,सह सुतळी बॉम्ब विविध फटाके हाताने उडविण्याची जणू स्पर्धाच लागलेली पाहायला मिळत होती. आत नी हाताने रॉकेट भिरकावताना दिसले. तर कोणी तोंडाने रॉकेट उडवत होते. एकेकाच्या हातात १० ते १२ बॉक्स फटाक्यांचे घेऊन ते क्षणोक्षणी संपवत होते. मुख्य म्हणजे बहिरीनाथच्या उत्सवात जणू त्याचाच आशीर्वाद या उत्सवा सहभागी झालेल्यांच्या मागे असावा अशा पद्धतीने हे फटाके आपल्या शरीराजवळून जाताना देहिक तरुणांमध्ये उत्साह संचारलेला दिसून येत होता. सर्वीकडे गुलाल, धूर आगीचे गोळे असा वर्षाव होत असताना कोठेही कोणतीही दुर्घटना घडलेली नाही हे विशेष.
दिवाळे कोळीवाड्यात साजरी होणारी दिवाळी हीं खऱ्यार्थी खूप धाडसाची असते. या सोहळ्यादरम्यान गावात 24 तास फटाक्यांचा आवाज घुमत असतो. फक्त दोनचं दिवसात 50 लाखांहून अधिक किंमतीच्या फटाका एका वेगळ्या पद्धतीने फोडल्या जातात. मात्र, आजवर कधीही या गावात आगीच्या गंभीर घटना घडली नाही हीं बहिरीदेवाचीचं कृपा असल्याचे गावकरी सांगतात, असं फटाके विक्रेता संतोष कोळी यांनी सांगितलं आहे.






