नांदेड : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) दिवसेंदिवस विविध घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्ष असो किंवा भाजप, शिंदे गट या सर्व पक्षांकडून आपलं अस्तित्त्व सिद्ध करण्याचे काम केले जात आहे. असे असताना आता महाराष्ट्रातील राजकारणात आणखी एका राजकीय पक्षाने एंट्री केली आहे. इतकंच नव्हे तर या (Bharat Rashtra Samithi) पक्षाने राज्यातील सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणाही केली आहे.
नांदेड येथे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची जाहीरसभा झाली. यामध्ये त्यांचा नवा राजकीय पक्ष ‘भारत राष्ट्र समिती’नं महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश केला आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. केसीआर यांचा BRS पक्ष आगामी काळात महाराष्ट्रात सर्व जागा लढवणार असल्याचे विधान खासदार भीमराव पाटील (Bheemrao Baswanthrao Patil) यांनी केले आहे.
भीमराव पाटील म्हणाले की, आंधप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक याठिकाणी आम्ही जात आहोत. अनेकांनी इच्छा होती आम्ही तेलंगणात यायला हवं. ते शक्य नव्हतं. मात्र, आमच्या मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत येणाऱ्या काळात तुमच्या राज्यात येऊन या सर्व स्कीम राबवेन, असं म्हटलं होते. त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये सभा झाली असं त्यांनी सांगितले.
सरकारची कामे सुरु
तेलंगणा राज्यात केसीआर यांचे सरकार आल्यापासून विकासाची कामे सुरू आहेत. सर्व जाती-जमाती, शेतकऱ्यांसाठी आम्ही काम केले. हाच अजेंडा घेऊन आम्ही इतर राज्यात जाणार आहोत.
सर्व शेतकऱ्यांना सवलती देण्याचा आमचा मानस
गेल्या 8 वर्षांपासून विकासासोबतच अनेक योजनांच्या माध्यमांतून लोकांची सेवा केली आहे. प्रत्येक माणसाची गरज बघून मागासवर्गीय असो वा कुणीही सगळ्या यंत्रणा उभ्या करून त्यांना मदत केली आहे. सर्व सवलती शेतकऱ्यांना देण्याचा आमचा मानस आहे, असेही खासदार पाटील म्हणाले.