• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjp Launches Operation Lotus Say Samana News Paper Nrgm

भाजप ‘ऑपरेशन कमळ’ घडवतंय; सामनातून हल्लाबोल

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 22, 2022 | 08:53 AM
भाजप ‘ऑपरेशन कमळ’ घडवतंय; सामनातून हल्लाबोल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बंडखोर (Rebellion) शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Sinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेने ‘सामना’च्या (Samana) माध्यमातून टिका केली आहे. ‘महाराष्ट्रावर वार’ या मथळ्याखाली हा अग्रलेख लिहिण्यात आला असून यात भाजपला (BJP) लक्ष केले आहे. भाजप एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून ऑपरेशन कमळ (Operation Lotus) घडवत आहे, असे म्हटले आहे. धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करेल काय? असा सवालदेखील करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सरकारचे (MVA) काय होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? असे सवाल केले आहेत.

संकटांशी आणि वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये (Gujrat) या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच. महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे (Ajit Pawar) प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ घडवीत आहेत. काही करून राज्यातील सरकार घालवायचे याच ईर्षेने त्यांना झपाटलेले आहे. राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने कोणत्या छुप्या कारवायांमुळे जिंकली याचा उलगडा आता होत आहे. काल विधान परिषदेत भाजपास दहावी जागा जिंकण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांनीच राज्यसभेत भाजपचा धनदांडगा उमेदवार विजयी केला आणि संजय पवार या शिवसैनिकाचा पराभव घडवून आणला. सोमवारी विधान परिषदेत (MLC Election) दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहाएक आमदारांना ‘उचलून’ गुजरातला नेण्यात आले. त्यांच्याभोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले आणि भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईस पोहोचले. अशाप्रकारे चार-पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून ‘ऑपरेशन कमळ’वाल्यांच्या ताब्यात दिले. हा काय प्रकार आहे? अशाने लोकशाहीची काय इभ्रत राहणार आहे? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

विधान परिषदेतील दहाव्या जागेचा विजय भाजपने मिळवला तो शिवसेनेतील तथाकथित निष्ठावंत वगैरे म्हणवून घेणाऱ्या लोकांना बेइमान करून आहे. या निवडणुकीत काँगेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पाडून भाजपने विजय मिळवला. हंडोरे हे मुंबईतील दीन-दलित समाजाचे नेते आहेत. अशा दीन-दलितास पाडून भाजपने बेइमानांच्या मतांवर विजयोत्सव साजरा केला. त्याच बेइमानांना लगेच गुजरातच्या भूमीवर नेऊन जोरदार सरबराई सुरू झाली. शिवसेनेचे दोन उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी विजयी झाले, पण त्यांच्या अधिकृत मतांतही घाटा दिसत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकले, पण मतांची फाटाफूट घडवून भाजपने जो पाचवा विजय मिळवला ती कपटनीती म्हणजे भाजपचा खरा चेहरा आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी एका तळमळीने भाष्य केले. महाराष्ट्रात सत्तेचा माज चालणार नाही. केंद्रीय सत्तेचा माज दाखवून महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आईचे दूध विकणारी अवलाद शिवसेनेत नको, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत. असे लोक शिवसेनेत निर्माण व्हावेत ही महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानीच आहे. शिवसेना ही आई. तिच्या आणा-भाका घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आईच्या दुधाचा बाजार मांडला. त्या बाजारासाठी जागा निवडावी सुरतची. हा योगायोग समजायचा काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती व त्याच सुरतमधून आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयोग सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात महाराष्ट्राचे ठाकरे सरकार खुपत आहे, त्यापेक्षा जास्त शिवसेना खुपत आहे. त्यामुळे आधी शिवसेनेवर वार करा व मग महाराष्ट्रावर घाव घाला, असे राजकारण स्पष्ट दिसते. मध्य प्रदेश व राजस्थानात ज्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण करून सरकारे पाडली तोच ‘पॅटर्न’ महाराष्ट्रात वापरायचा व स्वतःला ‘किंग मेकर’ म्हणून ओवाळून घ्यायचे असे तीन अंकी नाटक सुरू झाले आहे. ‘विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेले मतदान व मतांची फाटाफूट ही तर सुरुवात आहे. आता आम्ही मुंबई जिंकू. मुंबईवर ताबा मिळवू,’ अशी भाषा मंगलप्रभात लोढा यांनी केली, यातच सगळे आले. मुंबईवर ताबा मिळवायचा असेल तर शिवसेना डळमळीत करा, हेच महाराष्ट्रद्रोह्यांचे धोरण आहे. स्वतःला ‘मावळे’ म्हणवून घेणारे त्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या कपट-कारस्थानाचे भागीदार होणार असतील तर शिवराय त्यांना माफ करणार नाहीत, असेही सामनातून म्हटले आहे.

महाराष्ट्र हे शहाण्यांचे राज्य आहे. शहाणपणाच्या बाबतीत महाराष्ट्र इतरांच्या बाबतीत दोन पावले पुढेच असेल. इतर प्रांतात व कळपांत दीडशहाणे असतील तर महाराष्ट्रात साडेतीन शहाणे असतात. दुसरे असे की, महाराष्ट्रास वेगात व वेडात दौडणाऱ्या ‘सात’ वीरांचा इतिहास आहे. पण ते सात वीर वेडात व वेगात दौडले ते स्वराज्यासाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नाही. म्हणूनच त्या वीरांना आजही मानवंदना दिली जाते. राजकारण हे वाईट नाही, पण सत्तेची अति महत्त्वाकांक्षा हे जालीम विष ठरते. शिवसेनेने ‘आई-बाप’ बनून असंख्य फाटक्या लोकांना जे दिले ते इतर पक्षांत भल्याभल्या वतनदारांना मिळवता आले नाही. शिवसेनेसाठी छातीचा कोट करून जो मावळा उभा राहिला त्याच्या त्यागातून भगवा झेंडा डौलाने फडकत राहिला. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी माती खाल्ली त्यांना महाराष्ट्राची माती व शिवसैनिक माफ करणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या राजकारणासाठी लाजच सोडली. एखाद्या राज्यात सत्ता मिळवता आली नाही म्हणून ते राज्य अस्थिर आणि डळमळीत करायचे, हेच त्यांचे धोरण आहे. माणसे फोडायची, फितुरीची बिजे रोवायची, त्या फितुरीचे पीक खडकावरही काढण्यात हे लोक पटाईत, पण देशातील बेरोजगार ‘अग्निवीर’ रस्त्यावर उतरला आहे, कश्मीरात हिंदूंचे हत्याकांड सुरू आहे. लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही योजना व धमक त्यांच्यात दिसत नाही. फितूर निर्माण करायचे व त्या जोरावरच राज्य आणायचे. हीच यांची ‘किंग मेकर्स’ कंपनी. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने तेव्हा हेच केले. ही ईस्ट इंडिया कंपनीही शेवटी गाशा गुंडाळून निघून गेली. विधान परिषद निकालाने त्या ईस्ट इंडिया कंपनीचा आत्मा महाराष्ट्रात फडफडताना दिसला. बरे झाले, या निमित्ताने महाराष्ट्र जागा झाला. महाराष्ट्र जागा झाला की पेटून उठतो, हा इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या फितूर मंडळाने लक्षात घ्यावा, असे सामनातून म्हटले आहे.

Web Title: Bjp launches operation lotus say samana news paper nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2022 | 08:50 AM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Eknath Sinde
  • Gujrat
  • Operation Lotus
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?
1

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?

‘तुम्ही खणखणीत नाणं दिलं तर खणखणीत विकासकामे जोमाने करू’; अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन
2

‘तुम्ही खणखणीत नाणं दिलं तर खणखणीत विकासकामे जोमाने करू’; अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन

इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार
3

इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार

नितीश कुमार फक्त चेहरा मात्र ‘स्टीअरिंग व्हील’ भाजपकडेच; अमित शहांनी खेळली ‘ही’ स्मार्ट खेळी
4

नितीश कुमार फक्त चेहरा मात्र ‘स्टीअरिंग व्हील’ भाजपकडेच; अमित शहांनी खेळली ‘ही’ स्मार्ट खेळी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
युद्धाची जोरदार तयारी सुरू! व्हेनेझुएलावर फुटणार अमेरिकेच्या क्रोधाचा ज्वालामुखी; trump चा लष्कराला आदेश…

युद्धाची जोरदार तयारी सुरू! व्हेनेझुएलावर फुटणार अमेरिकेच्या क्रोधाचा ज्वालामुखी; trump चा लष्कराला आदेश…

Nov 23, 2025 | 10:26 AM
हिवाळ्यात शरीरातील ऊबदारपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीने घरी बनवा भोपळ्याचे सूप, नोट करा रेसिपी

हिवाळ्यात शरीरातील ऊबदारपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीने घरी बनवा भोपळ्याचे सूप, नोट करा रेसिपी

Nov 23, 2025 | 10:24 AM
जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

Nov 23, 2025 | 10:20 AM
गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS

गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS

Nov 23, 2025 | 10:13 AM
Lucky Gemstones: कर्क राशीसाठी आहेत सर्वोत्तम रत्न, ‘हे’ परिधान केल्याने सर्व अडथळे होतील दूर

Lucky Gemstones: कर्क राशीसाठी आहेत सर्वोत्तम रत्न, ‘हे’ परिधान केल्याने सर्व अडथळे होतील दूर

Nov 23, 2025 | 10:11 AM
आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो, त्वचा होईल आतून स्वच्छ

आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो, त्वचा होईल आतून स्वच्छ

Nov 23, 2025 | 10:04 AM
हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

Nov 23, 2025 | 09:56 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.