मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मोहित कंबोज यांनी रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटही केलं आहे.
जनहितार्थ जारी..@Dev_Fadnavis @AmitShah @CPMumbaiPolice @narcoticsbureau
महाशय आपण काय कारवाई केली ते जनतेला कळू द्या.
येथे अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती आहे.. भाजपचे हिंदुत्व येथे काय करीत होते?cc tv footej लगेच ताब्यात घ्या.
खोक्यांचे राज्य हे अमली… pic.twitter.com/xIrWrPoAoM— Sanjay Raut (@rautsanjay61) April 30, 2023
मोहित कंबोज हे राज्यातील भाजप नेत्यांपैकी एक आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्याबाबतच संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडीओत सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्याबाबत दावा करत आहेत.
कांबळे यांनी रात्री साडेतीन वाजता व्हिडिओ काढला आहे. त्यामध्ये म्हटलं की, ‘लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत. धिंगाणा घालत आहेत’.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या, नाहीतर मी पाठवेन
आतमध्ये काय झालं याबाबतीत सर्व फुटेज माझ्याकडे आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या, नाहीतर मी पाठवेन. पण सरकार काय करतायत? गृहमंत्री कोणाला पाठिशी घालतायत का हे मला पाहायचंय, असे राऊत यांनी सांगितलं.
काय म्हटलंय ट्विटमध्ये?
‘महाशय आपण काय कारवाई केली ते जनतेला कळू द्या. येथे अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती आहे. भाजपचे हिंदुत्व येथे काय करीत होते? cc tv footej लगेच ताब्यात घ्या.
खोक्यांचे राज्य हे अमली पदार्थांचे राज्य होऊ नये.
जय महाराष्ट्र!
संजय राऊत यांचं गृहमंत्र्यांना पत्र
याप्रकरणी संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे.