विनय नातूंचे भास्कर जाधवांना प्रत्युत्तर (फोटो- सोशल मीडिया/ani)
१. भास्कर जाधवांच्या विधानाने राजकारण तापले
२. गुहागरात ब्राह्मण समाज आक्रमक
३. विनय नातूंचे जाधवांना प्रत्युत्तर
Vinay Natu: राज्याच्या राजकारणात भास्कर जाधव यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. “ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. आज मी जे बोलतोय, त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही,” अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघावर हल्लाबोल केला आहे. भास्कर जाधव यांच्या विधानानंतर आता राज्यातील वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. गुहागर भाजपचे नेते डॉ. विनय नातू यांनी भास्कर जाधवांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव?
गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. त्यातच सोमवारी मुंबईत पार पडलेले्या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण संघाचे गुहागर तालुकाध्यक्ष धनशाम जोशी यांना बेडकाची उपमा देत चांगलीच आगपाखड केली. मला पराभूत कऱण्यासाठी तालुक्यातील बौद्ध समाजाला माझ्या विरोधात भडकावलं. वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला, त्यातही माझे नाव घेण्यात आले. ठाण्यातील त्या नेत्यालाही मी सोडणार नाही. घनशाम जोशींनी पक्ष म्हणून पत्र लिहायला पाहिजे होतं. पण त्यांनी समाज म्हणून पत्र लिहीलं याचं वाईट वाटलं.
भाषणात जाधव म्हणाले, “मला आज तुमच्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मी जर आता बोललो नाही तर भविष्यात काळ अडचणीचा ठरू शकतो. माझी निवडणूक नुकतीच झाली आहे, त्यामुळे चार वर्षे मला काही अडचण नाही. अनेक जण मला सोडून गेले, काहींनी माझा फायदा घेतला, पण मी काही बोललो नाही. यामुळे त्यांना वाटू लागले की हा काहीच करू शकत नाही. मात्र, आतापर्यंत मी गप्प बसलो होतो, पण आता मी कोणालाही सोडणार नाही.”
भाजप नेते विनय नातूंचे प्रत्युत्तर
अजून आमचे सैनिक तसेच जागेवर आहेत, हे दाखवण्यासाठी सभेत केलेलं हे वक्तव्य आहे. त्यामुळे ही राजकीय सभा होती. या राजकीय सभेमध्ये खोत, ब्राह्मण या सर्व विषयांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. कोणत्याच पत्रात माफी मागण्याचा विषय आला नाहीये.