खरंच वेगळा पक्ष काढणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'हो पक्ष निर्माण झालाच आहे...'
महायुती सरकारमधील भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढण्यासंदर्भात मत व्यक्त केलं होतं. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पंकजा मुंडे वेगळी चूल मांडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. या सर्व चर्चांदरम्यान पंकजा मुंडे यांनी त्या विधानावर आज प्रतिक्रिया दिली आहे. “आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. “आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पक्षासंदर्भात विधान केलं होतं.
“भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील”, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी, पंकजा मुंडे वेगळा पक्ष काढत असतील तर त्यांना शुभेच्छा, असं म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“नाशिकमध्ये एक गिरासे म्हणून डॉक्टर आहेत. त्यांनी माझ्याआधी भाषण केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम करायचो. त्यांना अनेकदा भेटायचो. तेव्हा ते म्हणाले ताई तुम्हाला माहिती आहे का की गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक एवढे आहेत ते मोजायला गेलं तर एक पक्ष निर्माण होईल असं ते म्हणाले. त्यांच्या विधानाला उत्तर देताना मी म्हटलं की, हो पक्ष निर्माण झालाच आहे. आता या पक्षाशी (भाजपा) देखील त्यांच्यावर (गोपीनाथ मुंडे) प्रेम करणारे लोक जोडले गेलेलेच आहेत. आता आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही”, असं पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
Mahayuti Politics: अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार? फडणवीस-राज ठाकरे भेटीनं चर्चांना उधाण
“गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील.” तसेच गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्यावर प्रेम करणारे हे सर्व लोक गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. लोक गुणांचा वारसा स्वीकारतात. गुणांवर प्रेम करतात. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभा आहे. भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून गोपीनाथ मुंडे यांनी काम करून पक्ष उभा केला”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.