PMC Election 2026: पुण्यात भाजपला धक्का; वसंत अमराळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
हा पक्ष प्रवेश सोहळा पुण्यातील शिवाजीनगर भागात बुधवारी सायंकाळी झाला आहे. अमराळे यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही राष्ट्रवादीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पक्ष प्रवेशावेळी अजित पवार यांनी अमराळे यांच्या कामाचे कौतुक केले.
Delhi High Court News: केंद्र व आरबीआयला दिल्ली हायकोर्टाचा दणका! डिजिटल लोन अॅप्सची होणार चौकशी
अजित पवार म्हणाले की, बाळासाहेब अमराळे यांचं भाषण मी बारकाईने ऐकलं. एखाद्या पक्षात 25 वर्षं काम करून अन्याय झाल्यानंतर माणूस नाउमेद होतो. भाजपमध्ये अन्याय झाल्यामुळे बाळासाहेबांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीमध्ये अमराळे यांचं मनापासून स्वागत करतो. पंचवीस वर्षे भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठीही त्यांनी अनेक मेळावा घेतले.
चिंचवडच्या ‘दवा बाजार’मध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच दुकाने फोडली अन्
भाजप पक्षासाठी त्यांनी मोठं काम केलं. बाळासाहेब यांच्या उपक्रमाची दखल लोकशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी घेतली आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते बाळासाहेब अमराळे यांना श्रावणबाळ पुरस्कार मिळाला. अनेक गुणवंताचा सन्मान बाळासाहेब अमराळे यांनी आतापर्यंत केलेला आहे. बाळासाहेब अमराळे यांनी माणसं जोडली. एक परिवार म्हणून त्यांना आधार देण्याचं काम केलं. भारतीय जनता पक्षात अन्याय केल्यामुळे बाळासाहेबांच्या मनाला वेदना झाल्या त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांचा अनुभव, त्यांचा प्रामाणिकपणा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी मोलाचा ठरेल. समाजात तळमळीने काम करणारा नेता, अशी बाळासाहेबांची ओळख आहे.






