पंढरपूर : लोकसभा निवडणूकीच्या सुरुवातीपासून भाजपकडून 400 पारचा नारा दिला जात आहे. प्रचारामध्ये भाजपने अब की बार 400 पार असा अजेंडा राबवला आहे. त्यामुळे यंदा भाजप किती जागा निवडून येणार याकडे देशभराचे लक्ष लागले. इंडिया आघाडीकडून भाजपचा 400 पाराच्या दाव्यावर आरोप केला जात आहे. यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री दावसाहेब दानवे यांनी भाजप 400 पार करणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे असा दावा दावसाहेब दानवे यांनी केला आहे. पंढरपूरामध्ये वैषाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त दानवे दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ही काळ्या दगडावरची पांढरी रेष
माध्यमांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताचा आकडा गाठणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात देखील महायुतीला 45 पेक्षा जास्ता जागांवर विजय मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा विश्वास देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बहुमत मिळाला नाही तर काय सवाल विचारण्यात आला. याबाबत बोलताना दानवे म्हणाले, राजकारणात काही होऊ शकतं. पण आम्हाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही. आम्ही तर त्यांना पाठिंबा मागितलेला नाही. आम्हाला त्यांची गरज पडणार नाही. आमच्या 400 हून अधिक जागा नक्कीच मिळणार,” असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.
देशातील मतदार राजा हुशार
तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण न दिल्यास विधानसभेची निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, “देशात लोकशाही आहे. त्यामुळे मनोज जरांगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. देशातील मतदार राजा हुशार आहे. विधानसभेला उभे राहिले तर त्यावेळेस लोक ठरवतील. जनता कोणाला पाठिंबा देते हे पाहावे लागेल असं ही त्यांनी नमूद केले. आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही. आरएसएसची आमची मातृ संस्था आहे,” असे देखील रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.