कल्याण पूर्वेत रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमादरम्यान जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते एका शाळेच्या पालक राडा झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. भाजप आमदार यांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षापासून हा रस्ता आहे. सरकारी निधीतून या रस्त्याचे काम होणार आहे. तर पालकांचे म्हणणे आहे की, ही चर्चची खाजगी जागा आहे. या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम होऊ शकत नाही.
कल्याण पूर्वेत नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर जरीमरी परिसर आहे. या परिसरात असलेल्या एका रस्त्याचा भूमीपूजन कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्तेभूमीपूजन होणार होणार होते. भाजप आमदार गायकवाड भूमीपूजनाच्या ठिकाणी पोहचले. त्याठिकाणी स्थानिक नागरीक जमा झाले. नागरीकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पालकांचे म्हणणे आहे की, ही जागा चर्चची आहे.
भाजप आमदार गायकवाड यांचे म्हणणे आहे की, हा आरक्षित भूखंड आहे. सरकारने रस्त्यासाठी निधी दिला आहे. कोणी रस्ता बंद करुन शकत नाही. आम्ही भूमीपूजन केले आहे. रस्त्याचे काम सुरु होणार या दरम्यान जोरदार राडा झाला. यामध्ये महिला लहान मुले वयोवध्द्ध या राड्यात सामिल झाले होते. चर्चची जागा असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, दादागिरी करुन आमच्या जागेवर काम केले जात आहे. आमच्या लोकांना मारहाण झाली आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी महिला लहान मुलांना मारहाण केली आहे.