पोस्टातून बुक करता येणार रेल्वे तिकीट (फोटो- istockphoto)
आता पोस्टात देखील मिळणार रेल्वेचे तिकीट
लांब रांगेत प्रवाशांना उभे राहावे लागणार नाही
सध्या काही निवडणूक पोस्ट कार्यालयामध्ये सुविधा
पुणे/चंद्रकांत कांबळे: पोस्ट कार्यालयातून रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी भारतीय डाक विभाग आणि रेल्वे मंत्रालयाने एकत्र येऊन ही नवी सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही किंवा ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी स्टेशनपर्यंत जावे लागणार नाही. ही सुविधा सध्या देशभरातील काही निवडक पोस्ट कार्यालयामध्ये उपलब्ध आहे, ज्यात पुणे रेल्वे विभागातील इचलकरंजी आणि उरुळी कांचन या पोस्ट कार्यालयांचा समावेश आहे.
पुणे विभागातील इचलकरंजीचा सीपी कोड ८२५ आहे. एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यात ५२२७ प्रवाशांनी तिकिट काढलेले आहेत.सरासरी दररोज २८ तिकिट काढले जातात. ज्यात फिजिकली फॉर्म भरून दिला जातो या फॉर्ममध्ये एक,दोन,तीन गरजेनुसार तिकीट काढले जातात. उरुळी कांचणचा सीपी कोड ८७७ असून येथून १६७८ प्रवाशांनी तिकिट काढले आहेत.दररोज येथून ९ तिकिट काढले जातात. काही वेळा संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे तिकीट बुक करणे शक्य होत नाही; मात्र आता प्रवाशांना पोस्ट रेल्वे कार्यालयामधून तिकिटे बुक करता येतात.
तिकीट बुक कसे करावे ?
रेल्वे तिकीट फक्त अशा पोस्ट ऑफिसमधून बुक करता येतात जिथे पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम (पीआरएस) टर्मिनल उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे, अशी पोस्ट ऑफिस शोधा जिथे पीआरएस काउंटर आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्या. प्रवास कुठून कुठे करायचा आहे, तारीख, ट्रेनचे नाव किंवा नंबर, तिकिटाची श्रेणी नंतर फॉर्म भरून पेमेंट करा. तिकीट तिथेच बुक केले जाईल.
रेल्वे प्रशासनाकडून काही ठराविक पोस्ट कार्यालयात तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे.पुणे विभागातून इचलकरंजी आणि उरुळी कांचण या पोस्ट कार्यालयात हि सुविधा उपलब्ध आहे. हे तिकिट फिजिकल स्वरूपाचे असून यामुळे प्रवाशांच्या सुविधेत भर पडत आहे.
हेमंत कुमार बेहरा,
विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकरी,मध्ये रेल्वे पुणे
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी
भारतीय रेल्वेने प्रवाशांना अधिक चांगला, आरामदायक आणि निष्पक्ष अनुभव देण्यासाठी लोअर बर्थ (Lower Berth) च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांमुळे आता लोअर बर्थवर प्राधान्य कोणाला मिळणार आणि सीटवर बसण्या-झोपण्याच्या वेळेचा गोंधळ कसा दूर होणार, हे स्पष्ट झाले आहे.






