Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: विश्वचषकाचा भारतीय U19 संघाचा शुभारंभ, नाणेफेक जिंकले! आयुष म्हात्रेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

Maharashtra Breaking news live: देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 15, 2026 | 05:54 PM
Top Marathi News Today Live: चांदीचे दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार? वाढत्या दराने ग्राहक चिंतेत

Top Marathi News Today Live: चांदीचे दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार? वाढत्या दराने ग्राहक चिंतेत

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News: भारत विरुद्ध यूएस पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये भारताकडून वैभव सुर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे दोघे संघासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानावर उतरणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाचे उपकर्णधारपद हे विहान मल्होत्राकडे असणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यत अंडर 19 विश्वचषक सहा वेळा नावावर केला आहे त्यामुळे आता भारतीय संघ सातव्यांदा टायटल नावावर करण्याचा प्रयत्न करेल.

 

 

 

The liveblog has ended.
  • 15 Jan 2026 05:40 PM (IST)

    15 Jan 2026 05:40 PM (IST)

    लाडकी बहीण योजनेमुळे वारं फिरणार?

    PMC Municipal Election 2026: राज्यात महापालिका निवडणुकीच्या एक दिवस आधी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. यात पुणे जिल्ह्यातील महिलांचाही समावेश होते. त्यामुळे राजकीय वातावरणच चांगलेच तापल्याची चर्चा आहे. १४ जानेवारी रोजी, जिल्ह्यातील १.७१९ दशलक्ष महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा करण्यात आला. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता निवडणुकीच्या तोंडावर दिला जाणार असल्यामुळे आधीच राजकीय पक्षांकडून सत्ताधारी महायुतीवर आरोप सुरू होते. मतदानाच्या काही तास आधी योजनेचा निधी जमा झाल्यामुळे त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार, असल्याची चर्चा सुरू झाली.

  • 15 Jan 2026 05:27 PM (IST)

    15 Jan 2026 05:27 PM (IST)

    बॉलीवूड अभिनेता दीपक तिजोरींची मोठी फसवणूक

    बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते दीपक तिजोरी एका मोठ्या फसवणुकीला बळी गेले आहेत. अभिनेत्याने आरोप केला आहे की त्याची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. दीपकने अलीकडेच बांगूर नगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याच्या पुढील चित्रपट प्रकल्पासाठी निधी देण्याच्या बहाण्याने तीन लोकांनी अभिनेत्याला ५ लाख रुपयांना फसवले असे आरोप अभिनेत्याने केले आहे. या फसवणुकीसंदर्भात पोलिसांनी कविता शिबाग कूपर, फौजिया अर्शी आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गोरेगावमध्ये घडली असल्याचे समजले आहे

  • 15 Jan 2026 05:13 PM (IST)

    15 Jan 2026 05:13 PM (IST)

    रोहित पवारांचे भाजपवर गंभीर आरोप

    महाराष्ट्रात आज सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा आहेत. उद्या निकाल लागणार आहे. कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार? हे चित्र उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. आजच्या मतदानावरुन राजकीय नेत्यांचे आरोप- प्रत्यारोप सुरुच आहेत. अशातच आता मतदानाच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 15 Jan 2026 05:06 PM (IST)

    15 Jan 2026 05:06 PM (IST)

    नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250 आणि SF 250

    Suzuki Gixxer SF 250 आणि Gixxer 250 या दोन्ही बाईक्सना नवीन अपडेट देण्यात आले आहे. या अपडेटमध्ये नव्या रंगांच्या पर्यायांसह आकर्षक ग्राफिक्सचा समावेश करण्यात आला आहे. Gixxer SF 250 ही बाईक ग्लास स्पार्कल ब्लॅक तसेच पर्ल ग्लेशियर व्हाईट/मेटॅलिक मॅट प्रीमियम सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर Gixxer 250 साठी पर्ल ग्लेशियर व्हाईट/मेटॅलिक मॅट प्रीमियम सिल्व्हर, मेटॅलिक ट्रायटन ब्ल्यू/ग्लास स्पार्कल ब्लॅक आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक असे रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत.

  • 15 Jan 2026 04:50 PM (IST)

    15 Jan 2026 04:50 PM (IST)

    अंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल, लैंगिक शोषणानंतर पीडित महिलेची छतावरून उडी

    उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. हाथरस गावातील महिलेचे एका तरुणाने अंघोळ करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या लैंगिक संबंध ठेवले. जेव्हा महिलेच्या पाटील याची माहिती मिळाली तेव्हा त्याने तिला घराबाहेर काढले. या सगळ्याला कंटाळून महिलेने त्यांच्या घराच्या छतावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती यात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहे.

  • 15 Jan 2026 04:49 PM (IST)

    15 Jan 2026 04:49 PM (IST)

    जयसोबतच्या घटस्फोटानंतर लगेचच, माही विजने खरेदी केली आलिशान कार! खास मैत्रिणीने केले कौतुक; म्हणाली “आणखी १०…’

    माही विज सध्या चर्चेत आहे कारण तिने तिचा एक्स पती जय भानुशाली सोबत घटस्फोट घेतला आहे. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि आणि त्यांची मुले देखील त्यांच्या निर्णयानुसार विभक्त झाले. आता, माहीने तिचे नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. माहीने तिच्या नवीन कारचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नसले तरी, तिची जवळची मैत्रीण आरती सिंगने तिला अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे.

  • 15 Jan 2026 04:48 PM (IST)

    15 Jan 2026 04:48 PM (IST)

    ”मी BJP ला मतदान केलं”, मतदानानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट करत जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल

    राज्यात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडत आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. अनेक नेते मंडळी, सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. मराठी अभिनेता आरोह वेलणकरने देखील त्याचा मतदानाचा हक्क बजावत राज्यातील महानगरपालिका निवडणुकतीच मतदान केलं आहे.

  • 15 Jan 2026 04:00 PM (IST)

    15 Jan 2026 04:00 PM (IST)

    ‘जन नायकन’ चित्रपटाला मोठा झटका!

    सर्वोच्च न्यायालयाने थलापती विजय आणि त्यांच्या “जन नायकन” चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का दिला आहे. गुरुवारी, देशातील सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाभोवतीच्या वादात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्याची सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून परवानगी मागण्याची याचिका फेटाळून लावली आहे. “जन नायकन” च्या प्रदर्शनाचा निर्णय आता मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे राहील, जिथे २० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

  • 15 Jan 2026 03:50 PM (IST)

    15 Jan 2026 03:50 PM (IST)

    Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीमध्ये खळबळ, घरात झाली चोरीBigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीमध्ये खळबळ, घरात झाली चोरी

    बिग बॉस मराठी ६ चे पर्व सुरू होऊन ४ दिवस झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कमालीची खळबळ माजली आहे. घरामध्ये एक मोठी ‘चोरी’ झाल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे घरातील सर्व स्पर्धक अवाक झाले आहेत. या चोरीमागे नेमका कोणाचा हात आहे, यावरून आता घरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, घरातील सदस्य या चोरीबद्दल एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काही स्पर्धक याला ‘वृत्ती’ म्हणत आहेत, तर काही जण त्या व्यक्तीला उघड पाडण्याची मागणी करत आहेत. “घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की तो माणूस कोण आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • 15 Jan 2026 03:40 PM (IST)

    15 Jan 2026 03:40 PM (IST)

    Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी…

    सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईची बंदुकीतून गोळी झाडून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या आईचे नाव वासंती वासुदेव सरमळकर (६५) असे आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेल्या अणसूर गावात बुधवारी रात्री घडली. आरोपीला अटक करण्याची कारवाई सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

     

  • 15 Jan 2026 03:29 PM (IST)

    15 Jan 2026 03:29 PM (IST)

    'खेळाडूंनी प्रशिक्षकांचा सल्ला घेतला नाही, तर व्यवस्था उद्ध्वस्त...'

    Statement by Task Force head Pullela Gopichand : पुलेला गोपीचंद यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स स्थापण केली गेली आहे. या टास्क फोर्सचा असा विश्वास आहे की भारताची प्रशिक्षण प्रणाली विखुरलेली आणि विसंगत आहे, ती संस्थात्मक ताकदीपेक्षा वैयक्तिक प्रयत्नांवर जास्त अवलंबून आहे. क्रीडा मंत्रालयाने नियुक्त केलेले टास्क फोर्स, प्रशिक्षणादरम्यान खेळाडू “अस्वस्थ” होतात तेव्हा बोलण्याच्या प्रशिक्षकांच्या अधिकारांना प्राधान्य देण्याचे समर्थन करते. अहवालात आंतरराष्ट्रीय उत्कृष्टतेकडे नेणाऱ्या प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक उपाय सुचवले आहेत. टास्क फोर्सचा असा विश्वास आहे की दशकांपूर्वी तयार केलेली ही प्रणाली “आज आवश्यक असलेले प्रमाण, गुणवत्ता आणि वेग प्रदान करू शकत नाही.” त्याच्या अहवालात, टास्क फोर्स तीन-स्तरीय प्रणाली आणि खेळाडूंसारखी शिफारस करतो.

     

  • 15 Jan 2026 03:15 PM (IST)

    15 Jan 2026 03:15 PM (IST)

    हिरव्यागार मटारपासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चमचमीत टिक्की

    थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मटार उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मटार खायला खूप जास्त आवडतात. कारण मटार चवीला गोडसर असतात. मटारपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी मटार टिक्की तर कधी मटार पनीर बनवून जेवणाची चव वाढवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला मटारपासून टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं कायमच चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी कायमच सहज पचन होणारा आणि चविष्ट पदार्थ खावा. मटार पराठा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर आणून घेऊया मटार टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.

  • 15 Jan 2026 03:10 PM (IST)

    15 Jan 2026 03:10 PM (IST)

    Vastu Tips: पाइराइट स्टोनपासून बनवलेली 7 घोड्यांची फ्रेम बदलू शकते नशीब

    प्रत्येकालाच आपल्याला आवडीनुसार घराची सजावट करायला आवडते. बरेच जण वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घरात विविध प्रकारचे चित्र लावतात. ते सजावटीच्या वस्तू देखील ठेवतात. बरेच लोक त्यांच्या घरात सात घोड्यांचे चित्र असलेली फोटो फ्रेम देखील ठेवतात. वास्तु आणि फेंगशुईनुसार, हे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, पायराइटपासून बनवलेले हे सात धावणारे घोडे तुमच्या घरात ठेवणे खूप फायदेशीर ठरू शकते का? जाणून घ्या

    वाचा सविस्तर 

  • 15 Jan 2026 02:50 PM (IST)

    15 Jan 2026 02:50 PM (IST)

    बांगलादेशी खेळाडूंनी बीपीएलवर टाकला बहिष्कार, सामन्यापूर्वी स्टेडियममध्येच पोहोचले नाहीत प्लेअर्स!

    बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि भारतीय नियामक मंडळाचा वाद विश्वचषकावरून सुरू होता. त्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. सोशल मिडियावर सध्या त्याच्या विश्वचषकाच्या ठिकाणांवरुन तर चर्चा सुरू आहेतच. आता बांगलादेश प्रिमियर लीग देखील खेळण्यास खेळाडूंनी नकार दिला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. खेळाडूंनी २०२५-२६ बांगलादेश प्रीमियर लीगवर बहिष्कार टाकला आहे. सामन्यांपूर्वी खेळाडू स्टेडियमवर पोहोचलेही नाहीत, ज्यामुळे बोर्ड कठीण परिस्थितीत सापडले आहे.

  • 15 Jan 2026 02:45 PM (IST)

    15 Jan 2026 02:45 PM (IST)

    अमेरिकेचा विश्वासघात! ट्रम्पला पत्ताच नव्हता अन् इराणने खेळली चाणाक्ष राजनैतिक चाल

    जगाचे लक्ष सध्या इराणमधील (Iran) धुमसणाऱ्या निदर्शनांकडे असतानाच, आंतरराष्ट्रीय राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. गेल्या १९ दिवसांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या यादवी सदृश परिस्थितीत, इस्रायल आणि इराण या कट्टर शत्रूंनी रशियाच्या मदतीने एक ‘गुप्त समझोता’ केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे, आपल्या सर्वात जवळच्या मित्राने म्हणजेच इस्रायलने हा करार करताना अमेरिकेला पूर्णपणे अंधारात ठेवल्याचे समोर आले आहे.

  • 15 Jan 2026 02:40 PM (IST)

    15 Jan 2026 02:40 PM (IST)

    रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण, तब्बल इतक्या लाख कोटींचा बसला फटका

    जागतिक अनिश्चिततेच्या काळात, २०२६ हे वर्ष रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी विशेषतः चांगले राहिले नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून, कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत सुमारे ७ टक्क्यांनी घसरण झाली आहे, ज्यामुळे बाजार भांडवलात अंदाजे १.४ लाख कोटींची घट झाली आहे. रिलायन्सच्या शेअर्सवरील दबावाची मुख्य कारणे रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत वाढलेली चिंता आणि कंपनीच्या किरकोळ व्यवसायातील मंदी असल्याचे मानले जाते. ही घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील दिग्गज कंपनीने २०२५ मध्ये अपवादात्मकपणे चांगली कामगिरी केली होती, निफ्टीवर त्यांचे शेअर्स जवळजवळ २९ टक्क्यांनी वाढले होते.

  • 15 Jan 2026 02:35 PM (IST)

    15 Jan 2026 02:35 PM (IST)

    तारा सुतारियासोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये वीर पहारियाची क्रिप्टिक पोस्ट

    “स्काय फोर्स” चित्रपटातील अभिनेता वीर पहाडिया सध्या तारा सुतारियासोबतच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे चर्चेत आहे. या अफवांमध्ये, वीर अलीकडेच नुपूर सेनन आणि स्टेबिन बेनच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकटा दिसला होता, ज्यामुळे ब्रेकअपच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली. आता, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वीरने इंस्टाग्रामवर त्याच्या नवीन फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये गूढ पोस्ट शेअर केली आहे. वीरने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काय लिहिले आहे ते तुम्हाला सांगतो.

  • 15 Jan 2026 02:30 PM (IST)

    15 Jan 2026 02:30 PM (IST)

    प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला

    प्रेमात व्यक्ती वेडा होतो असं म्हटलं जातं. या वेडेपणची कोणतीही हद्द नाही. प्रेमात पागल होऊन अनेकजण अशा काही गोष्टी करतात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. अशात अलीकडेच अमेरिकेतील टेनेसी येथील एका महिलेची अनोखी कहाणी समोर आली आहे ज्यात तिने प्रेमाच्या वेडेपणाची मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. महिलेच्या पतीचे निधन झाले असून ती जेव्हाही त्याच्या आठवणीत व्याकुळ होते तेव्हा ती पतीच्या अस्थी चाटण्यास सुरुवात करते. महिलेने दावा केला आहे की, तिला पतीच्या अस्थी चाटण्याचे आता व्यसन लागले आहे.

  • 15 Jan 2026 02:25 PM (IST)

    15 Jan 2026 02:25 PM (IST)

    नीट-पीजी पात्रता निकषांवर आता ‘यू-टर्न’! निकष शिथिल केल्यास गुणवत्ता धोक्यात

    नीट-पीजी २०२५ परीक्षेसाठी पात्रता टक्केवारीत मोठी कपात करण्याच्या राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळाच्या (एनबीईएमएस) प्रस्तावावरून सुरू झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने अखेर ‘यू-टर्न’ घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) व्यक्त केलेल्या तीव्र आक्षेपांची दखल घेत सरकारने १३ जानेवारी २०२६ रोजी सुधारित अधिसूचना जारी केली. या निर्णयामुळे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील गुणवत्ता अबाधित ठेवत जागा रिक्त राहण्याचा धोका टळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

  • 15 Jan 2026 02:18 PM (IST)

    15 Jan 2026 02:18 PM (IST)

    ट्रम्पचे फासे पडले उलटे! अमेरिका नव्हे तर चीनलाच बनवतोय ग्रेट

    ECFR 21-country survey Trump China 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे “मेक अमेरिका ग्रेट अगेन” (MAGA) हे ब्रीदवाक्य जगभरात गाजत असले तरी, एका नव्या जागतिक सर्वेक्षणाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ (ECFR) या प्रभावशाली थिंक टँकने केलेल्या २१ देशांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका पुन्हा महान होण्याऐवजी चीनला जागतिक महासत्ता बनण्यासाठी आयती संधी मिळत आहे.

  • 15 Jan 2026 01:45 PM (IST)

    15 Jan 2026 01:45 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुन्हा लांबणीवर! ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्कावर न्यायालयीन पेच

    अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वादग्रस्त “परस्पर शुल्क” वरील निर्णय पुन्हा एकदा राखून ठेवला आहे. या महत्त्वाच्या आर्थिक प्रकरणावरील निर्णय न्यायालयाने सलग दुसऱ्यांदा पुढे ढकलला आहे. यापूर्वी, न्यायालयाने ९ जानेवारी रोजी आपला निर्णय पुढे ढकलला होता आणि आता, १४ जानेवारीच्या सुनावणीत, पुढील तारीख जाहीर केलेली नाही. हे संपूर्ण प्रकरण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणाशी संबंधित आहे, ज्या अंतर्गत त्यांनी अमेरिकेच्या जवळजवळ सर्व प्रमुख व्यापारी भागीदारांवर १०% ते ५०% पर्यंतचे एकतर्फी शुल्क (आयात शुल्क) लादले.

  • 15 Jan 2026 01:40 PM (IST)

    15 Jan 2026 01:40 PM (IST)

    ”वेळ चांगली असो वा वाईट”, तारा सुतारियासोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये वीर पहारियाची क्रिप्टिक पोस्ट

    “स्काय फोर्स” चित्रपटातील अभिनेता वीर पहाडिया सध्या तारा सुतारियासोबतच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे चर्चेत आहे. या अफवांमध्ये, वीर अलीकडेच नुपूर सेनन आणि स्टेबिन बेनच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकटा दिसला होता, ज्यामुळे ब्रेकअपच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली. आता, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वीरने इंस्टाग्रामवर त्याच्या नवीन फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये गूढ पोस्ट शेअर केली आहे. वीरने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काय लिहिले आहे ते तुम्हाला सांगतो.

  • 15 Jan 2026 01:35 PM (IST)

    15 Jan 2026 01:35 PM (IST)

    हरभजन सिंगने सूर्यकुमार यादवबद्दल केले मोठे विधान

    भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे पुढील आव्हान हे टी20 विश्वचषक 2026 चे असणार आहे. हा विश्वचषक भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे, 2024 मध्ये भारताच्या संघाने विश्वचषक नावावर केला होता. यंदा भारताला त्याच्या घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याची संधी असणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे. सुर्यकुमार यादवकडे भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या निवृतीनंतर सोपवण्यात आले आहे.

  • 15 Jan 2026 01:25 PM (IST)

    15 Jan 2026 01:25 PM (IST)

    ईश्वरपुरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

    सांगली जिल्ह्यात सांगली महापालिकेसाठी मतदान आज सुरू असतांनाच इकडे ईश्वरपूरच्या राजकारणात मोठी घडामोड सुरू आहे. गेली दोन तीन दिवस नगरपालिकेच्या स्थानिक राजकारणात तीन पैकी एका स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्तीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ते एकत्र आल्यास भाजपा- शिवसेना महायुतीचे पक्ष एकाकी पडतील.माजी नगराध्यक्ष व अजित पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांची तीन दिवसांपूर्वी बैठक झाली आहे.

  • 15 Jan 2026 01:15 PM (IST)

    15 Jan 2026 01:15 PM (IST)

    पित्यानेच केला चिमुकलीचा खून, पत्नीवरील राग काढला मुलीवर; समाजमन हळहळले

    घरगुती वादामुळे वेगळी राहणारी पत्नी वारंवार मुलीचा ताबा मागत होती. त्यामुळे चिडून असलेल्या पतीने छातीत चाकू भोसकून मुलीचा खून केला. ही हृदयद्रावक घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी पहाटे ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. धनश्री शेखर शेंदरे (८) असे मृत मुलीचे तर शेखर कृष्णराव शेंदरे (४८) रा. सरोदेनगर, वाठोडा असे अरोपी बापाचे नाव आहे. या घटनेने समाजमन हळहळले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर हा बांधकाम मजूर आहे. त्याला दारूचे व्यसन आहे.

  • 15 Jan 2026 01:07 PM (IST)

    15 Jan 2026 01:07 PM (IST)

    इराणमध्ये AI ने घातला धुमाकूळ! आंदोलनाचे बनावटच VIDEO VIRAL

    इराणमधील (Iran) सरकारविरोधी निदर्शनांनी आता एक अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. रस्त्यांवरील संघर्षासोबतच आता इंटरनेटवर ‘माहिती युद्ध’ (Information War) सुरू झाले आहे. गेल्या १९ दिवसांपासून इराण धगधगत असतानाच, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तयार केलेले बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरत आहेत. यामुळे इराणमधील नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबत जगभरात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

  • 15 Jan 2026 12:40 PM (IST)

    15 Jan 2026 12:40 PM (IST)

    बीसीबी अधिकारी नझमुल यांच्या राजीनाम्याची मागणी, क्रिकेट न खेळण्याची दिली धमकी

    बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वित्त समितीचे अध्यक्ष नझमुल इस्लाम यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या क्रिकेटपटूंनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर क्रिकेटवर बहिष्कार टाकतील.

  • 15 Jan 2026 12:30 PM (IST)

    15 Jan 2026 12:30 PM (IST)

    भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

    भाजपने जन्माला घातलेली विषवल्ली महाराष्ट्राच्या जागरूक जनतेने ओळखावी आणि ही विषवल्ली आता कापल्याशिवाय शांत बसू नका, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे.

     

     

     

  • 15 Jan 2026 12:20 PM (IST)

    15 Jan 2026 12:20 PM (IST)

    रक्ताळलेल्या इराणचा भारताला मदतीसाठी फोन; एस. जयशंकर यांची अरघचींशी महत्त्वाची चर्चा

    इराणमध्ये (Iran) अंतर्गत बंडाळी आणि परकीय आक्रमणाची टांगती तलवार असतानाच, बुधवारी रात्री इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना फोन करून तातडीने संवाद साधला. या संभाषणाने जागतिक राजकारणात भारताची मध्यस्थ म्हणून असलेली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. जयशंकर यांनी स्वतः ‘X’ (ट्विटर) वर या चर्चेची पुष्टी करत म्हटले की, “इराण आणि आजूबाजूच्या प्रदेशातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर आमची सविस्तर चर्चा झाली आहे.”

  • 15 Jan 2026 12:10 PM (IST)

    15 Jan 2026 12:10 PM (IST)

    पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन;

    पहिल्यांदा ऑलिंपिक खेळामध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणारे खाशाबा जाधव यांची आज जयंती आहे. हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक (olympic) पदक विजेते कुस्तीपटू होते, ज्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये ५२ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला. कराड, सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर येथे जन्मलेले हे “पॉकेट डायनॅमो” म्हणून ओळखले जातात, ज्यांनी देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून दिले आणि मुंबई पोलीस दलातही सेवा बजावली.

  • 15 Jan 2026 12:00 PM (IST)

    15 Jan 2026 12:00 PM (IST)

    नागपुरात राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपकडे संशयाची सुई

    मतदान सुरु असतानाच नागपुरात एक मोठी घटना घडली आहे. नागपुरातील काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जळाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता आरोप - प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला असून भाजप कार्यकर्त्यांवर संशय घेतला जात आहे.

  • 15 Jan 2026 11:50 AM (IST)

    15 Jan 2026 11:50 AM (IST)

    ‘बीबी फार्म’ टास्कमध्ये सुरु झाला राडा, पहिल्या आठवड्यात ‘Bigg Boss’ चे धक्कादायक नॉमिनेशन

    'बिग बॉस मराठी ६' नुकतेच कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झाले आहे. तसेच घरात राडा, मज्जा आणि सदस्यांचा टास्क रंगला आहे. तसेच आता येणाऱ्या नव्या भागात 'बीबी फार्म' टास्कमध्ये सदस्यांमध्ये वाद होताना दिसणार आहे.

  • 15 Jan 2026 11:40 AM (IST)

    15 Jan 2026 11:40 AM (IST)

    मैत्रिणीच्या पित्यानेच 13 वर्षीय मुलीचा केला विनयभंग, वाढदिवसासाठी मैत्रिणीकडे गेली होती आणि…

    मुंबईच्या भांडुपमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मैत्रिणीच्या 46 वर्षीय वडिलांना पोलिसांनी अटक केली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 15 Jan 2026 11:30 AM (IST)

    15 Jan 2026 11:30 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याच्या प्रवेशाने मिळाले बळ

    महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापू लागले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यात सध्या वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली आहे. तालुक्यातील दोन गट आणि चार गणांमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपच्या गोटात सध्या बैठकांचा धडाका सुरू झाला असून, संभाव्य उमेदवारांची चाचपणी युद्धपातळीवर केली जात आहे.

  • 15 Jan 2026 11:22 AM (IST)

    15 Jan 2026 11:22 AM (IST)

    ज्ञानाचा महासागर असेल्याल्या ‘विकिपीडिया’चा आजच झाला जन्म

    आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तर आपण सर्वात आधी गुगलवर जातो आणि तिथे बहुतांश वेळा जे पहिले पान दिसते, ते असते ‘विकिपीडिया’चे (Wikipedia). माहितीचे हे अथांग विश्व आज आपला २५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. १५ जानेवारी २००१ रोजी जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर यांनी एका छोट्या कल्पनेतून सुरू केलेले हे व्यासपीठ आज जगातील सर्वात मोठे ‘मल्टीलिंग्वल फ्री एनसायक्लोपीडिया’ बनले आहे.

  • 15 Jan 2026 11:15 AM (IST)

    15 Jan 2026 11:15 AM (IST)

    ग्रीनलँडमध्ये नाटो देशांची सैन्य तैनाती; डोनाल्ड ट्रम्पला खुलं आव्हान

    Greenland War : ग्रीनलँडमध्ये NATO देशांनी सैन्याची तैनीत सुरु केली आहे. डेन्मार्कच्या नेतृत्त्वाखील स्वीडन, नॉर्वे, जर्मनी, फ्रान्स, नीदरलँडने आणि कॅनडाने आपले सैनिक ग्रीनलँडमध्ये पाठवले आहे. हे तैनाती डोनाल्ड ट्रम्प यांना थेट आव्हान मानले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. याला विरोध म्हणून नाटो देशांनी आणि युरोपीय देशांनी डेन्मार्कला पाठिंबा दिला आहे. यामुळे ग्रीनलँडमध्ये महायुद्धाची भिती निर्माण झाली आहे.

  • 15 Jan 2026 11:10 AM (IST)

    15 Jan 2026 11:10 AM (IST)

    पक्ष्यांच्या भरारीला नायलॉन मांजाचा लगाम! संक्रांतीत पतंगबाजीत ७२ पक्षी जखमी १० पक्षी रुग्णालयात दाखल

    संक्रांतीदरम्यान झालेल्या शहरात पतंगबाजीमुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी जखमी झाल्याचे समोर आले आहे. परेल वैद्यकीय रुग्णालयाच्या माहितीनुसार एकूण ७२ जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात आले असून, यातील ८ पक्ष्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यामध्ये १२ घारी आणि १ बगळा यांचा समावेश आहे. गंभीर जखमी अवस्थेत १० पक्ष्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरित पक्ष्यांवर घटनास्थळीच उपचार करून त्यांना निसर्गात सोडण्यात आले. हे सर्व पक्षी मांजामुळे जखमी झाले होते असल्याचे सांगण्यात आले. परळ पशुवैद्यकीय रुग्णालयाकडून जखमी पक्ष्यांच्या शोधात रुग्णवाहिका फिरत असते. त्या प्रमाणे आज पर्यंत ७२ जखमी पक्षी आढळले. वाचा सविस्तर

  • 15 Jan 2026 11:05 AM (IST)

    15 Jan 2026 11:05 AM (IST)

    मकरसंक्रांतीत नायलॉन मांजाचा कहर; अंधेरी उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा चिरला गळा, थोडक्यात बचाव

    मुंबई: पुन्हा एकदा मकरसंक्रांतीत नायलॉन मांजाचा कहर पाहायला मिळाला आहे. अंधेरी उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार जात असतांना नॉयलॉन मांज्यामुळे जीवघेणा अपघात झाला. यात दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने खोलवर जखम झाली. त्याला सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव भारत कदम (४५,बोरिवली) असे आहे. वाचा सविस्तर

  • 15 Jan 2026 11:00 AM (IST)

    15 Jan 2026 11:00 AM (IST)

    इराणचं हवाई क्षेत्र अचानक बंद

    राणमध्ये सध्या प्रचंड अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारतीय उड्डाणांवर परिणाम झाला असून प्रवाशांसाठी मोठी अपडेट देण्यात आली आहे. यामुळे भारतीय प्रवाशांसह आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या उड्डाणांवरही मोठी परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या प्रमुख भारतीय विमाना सेवांनी प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सल्लागार जारी केला आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने स्पष्ट केले आहे की, इराणच्या हावई क्षेत्रा मार्गे उड्डाण करणाऱ्या फ्लाइट्स मार्ग बदलण्यात आले आहेत. काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर काहींना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. यामुळे काही तास उशिर होण्याची शक्यता आहे.याचा हेतू प्रवासी आणि क्रू मेंबर्सची सुरक्षितात आहे. विमानतळावर सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे.यामुळे लोकांना ऑनलाइ सेवांचा वापर करण्याचे आवाहन दोन्ही विमान कंपन्यांनी केले आहे.

    #TravelAdvisory

    Due to the emerging situation in Iran, the subsequent closure of its airspace, and in view of the safety of our passengers, Air India flights overflying the region are now using an alternative routing, which may lead to delays. Some Air India flights where…

    — Air India (@airindia) January 15, 2026

  • 15 Jan 2026 10:58 AM (IST)

    15 Jan 2026 10:58 AM (IST)

    Municipal Election Voting 2026 Live: बोगस मतदाराने दुर्गादास शेट्टीच यांच आधीच मतदान केलं  

    Thane Municipal Election Voting:  दुर्गादास शेट्टी या मतदाराने आपल्या मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर आले असता त्यांच्या लक्षात आले की माझं मतदान यादीत झाला आहे...यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर दुर्गादास शेट्टी यांना बॅलेट नुसार मतदान करावे लागले.  एका बोगस मतदाराने दुर्गादास शेट्टीच यांच आधीच मतदान केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

  • 15 Jan 2026 10:55 AM (IST)

    15 Jan 2026 10:55 AM (IST)

    Municipal Election Voting 2026 Live: मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका

    Municipal Election Voting: मनसे नेते राजू पाटील यांनी सहकुटुंब काटई येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मनसेचे उमेदवार योगेश पाटील हेही उपस्थित होते. यावेळी प्रतिक्रिया देताना राजू पाटील म्हणाले, “आपल्या भागात अन्याय सुरू आहे. सर्व भूमिपुत्रांनी मतदानासाठी पुढे आले पाहिजे. मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही. युतीचा हा केवळ एक पॅटर्न आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. युतीमध्ये काहीही आलबेल नाही. सांस्कृतिक नगरी डोंबिवलीचे नाव या लोकांनी खराब करून टाकले आहे. येथील लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे.”

  • 15 Jan 2026 10:49 AM (IST)

    15 Jan 2026 10:49 AM (IST)

    आतापर्यंत या दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

    महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी देखीव मतदानाचा हक्क बााजवला आहे. संघप्रमुख मोहन भागवत यांनी नागपुर महानगरपालिकेसाठी मतदान केले आहे. मोहन भागवत सकाळी 7:30 वाजता संघ प्रमुख प्रभाग 22 मध्ये असलेल्या नागपुर नाइट हायस्कूलच्या मतदान केंद्रावर दाखल झाले होते. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • 15 Jan 2026 10:45 AM (IST)

    15 Jan 2026 10:45 AM (IST)

    Municipal Election Voting 2026 Live: मुंबईत पहिल्या दोन तासांत केवळ ६.९८ टक्के मतदान

    Mumbai Municipal Election Voting  : बहुप्रतीक्षित बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली असली, तरी सुरुवातीच्या टप्प्यात मतदारांचा प्रतिसाद संथ असल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी ९:३० वाजेपर्यंत मुंबईत केवळ ६.९८ टक्के इतक्या अल्प मतदानाची नोंद झाली आहे.

    सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून आली नाही. प्रशासनाने मतदानासाठी सर्व सोयी-सुविधा आणि कडेकोट बंदोबस्त तैनात केला असूनही, मतदारांमधील निरुत्साह चिंतेचा विषय ठरत आहे. मुंबईच्या उपनगरांच्या तुलनेत शहर भागात मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून समोर आले आहे.

  • 15 Jan 2026 10:37 AM (IST)

    15 Jan 2026 10:37 AM (IST)

    इराणमध्ये हिंसाचाराची धग कायम

    गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरु आहे. त्यातच इराणमध्येही परिस्थिती बिघडताना दिसत आहे. इराणमध्ये मृतदेहांचा ढीग साचत आहे. रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला आहे. हिंसक निदर्शने रोखण्यासाठी खामेनेई सरकारने क्रूर दृष्टिकोन स्वीकारला आहे. इराणमध्ये आत्तापर्यंत तब्बल 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 15 Jan 2026 10:29 AM (IST)

    15 Jan 2026 10:29 AM (IST)

    T20 World Cup 2026 मधून वगळल्यानंतर जितेश शर्माने सोडले मौन!

    २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात विकेटकीपर आणि फिनिशर मानले जाणारे जितेश शर्मा यांना संघात स्थान देण्यात आले नाही. तो मागील अनेक मालिकांमध्ये संघाचा भाग होता आणि त्याला संधी मिळत होत्या, परंतु निवडकर्त्यांनी आणि व्यवस्थापनाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी वेगळे संयोजन निवडले आणि जितेश शर्माला वगळण्यात आले. यावर जितेश शर्माची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. निवडकर्त्यांनी त्याला वगळल्याबद्दल आगाऊ माहिती दिली नसल्याचा दावाही त्यांनी केला.

  • 15 Jan 2026 10:21 AM (IST)

    15 Jan 2026 10:21 AM (IST)

    हरलीन देओलला रिटायर्ड आउट करुन UP Warriorz च्या अडचणी वाढवल्या

    महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामात मैदानावर विचित्र घटना घडल्या आहेत, सातव्या लीग सामन्यातही अशीच एक घटना घडली. दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स महिला संघामधील सामन्यात हरलीन देओलला अचानक बाद करण्यात आले, हा एक धक्कादायक निर्णय होता. यूपी वॉरियर्स संघाची सदस्य हरलीन देओल ३६ चेंडूत ४७ धावांवर फलंदाजी करत असताना यूपी वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी अचानक तिला डगआउटमधून परत येण्याचा इशारा दिला. तिच्या अचानक जाण्याने यूपी वॉरियर्सचा डाव डगमगला आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला २० षटकांत ८ बाद १५४ धावाच करता आल्या.

  • 15 Jan 2026 10:13 AM (IST)

    15 Jan 2026 10:13 AM (IST)

    इराणमध्ये लष्करी राजवट! ट्रम्पच्या मदतीपूर्वी खामेनेईंनी आवळला फास

    इराण (Iran) मधील परिस्थिती सध्या अधिक हिंसक बनत चालली आहे. सरकारविरोधी आंदोलन, हिंसाचार तीव्र वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर खामेनी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खामेनी सरकाने देशात मार्शल लॉ लागू केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे इराणमधील परिस्थितीवर लष्कराचे नियंत्रण असणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या आदेशानुसार आता इराणमधील परिस्थिती लष्कराचे नियंत्रण असणार आहे. सामान्य सरकारने अधिकारी तात्पुरत्या काळासाठी निलंबित करण्यात आले आहेत. यामुळे इराणमधील राजकीय संकट अधिक तीव्र झाले आहे.

  • 15 Jan 2026 10:06 AM (IST)

    15 Jan 2026 10:06 AM (IST)

    काळेवाडीत ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

    पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काळेवाडीमध्ये अपघाताची घटना घडली यात ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना काळेवाडीतील बीआरटी मार्गावर तापकीर चौकाकडून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा येथे काल (बुधवारी दि. १४ जानेवारी) दुपारी सव्वाच्या सुमारास घडली. दोघीही बहिणी संक्रांतीनिमित्त साड्या खरेदी करण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांच्यावर काळा घातला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

  • 15 Jan 2026 10:00 AM (IST)

    15 Jan 2026 10:00 AM (IST)

    चालू बाईकवर बायकोने 27 सेकंदात नवऱ्याला 14 कानशिलात हाणल्या

    व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, बाईकवर बसून पती आणि पत्नी कुठे तरी जात असल्याचे दिसते. पण याचवेळी काही वादावादीमुळे पत्नी रागातच पतीचे केस पकडून त्याला एका मागोमाग कानशिलात हाणू लागते. या व्हिडीओमध्ये दिसते की, पती बाइक चालवत आहे आणि पत्नी मागे बसली आहे. अचानक ती पतीवर हल्ला करते आणि एकापाठोपाठ पातीवर थप्पडांचा वर्षाव करू लागते. लोकांनी जेव्हा या थप्पड मोजल्या तेव्हा लक्षात आले की, महिलेने 27 सेकंदात तब्बल 14 वेळा पतीला कानाखाली मारली आहे. व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, पत्नीने पतीला त्याच्या एक्ससोबत पकडल्यामुळे ती पतीला मारत आहे.

  • 15 Jan 2026 09:52 AM (IST)

    15 Jan 2026 09:52 AM (IST)

    Municipal Election Voting 2026 Live : सचिन तेंडुलकर यांनी सांगितले मतदानाचे महत्त्व  

    मुंबईमध्ये, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी बीएमसी निवडणुकीत मतदान केल्यानंतर मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "मतदान करणे खूप महत्वाचे आहे. जसे आपण म्हणतो की प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, जर तुम्हाला विशिष्ट निकाल हवा असेल तर प्रत्येकाने येऊन मतदान करावे."

Web Title: Breaking news live blog marathi maharashtra national international crime sports economy breaking updates maharashtra latest update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • live updates
  • Marathi Breaking
  • Marathi News
  • Navarashtra Live Marathi

संबंधित बातम्या

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई
1

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन
2

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Karjat News : रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ? विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
3

Karjat News : रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ? विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 
4

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.