Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: अतिवृष्टीग्रस्तांसाठी १० कोटींचा निधी; ७ हजार ६५८ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, पीक नुकसानीसाठी मदत

Buldhana Farmers Flood Relief Fund: जून-जुलैतील अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. या निधीचा ७ हजार ६५८ बाधित शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 28, 2026 | 07:30 PM
Buldhana Farmers Flood Relief Fund:

Buldhana Farmers Flood Relief Fund:

Follow Us
Follow Us:
  • अतिवृष्टीग्रस्तांसाठी १० कोटींचा निधी
  • ७ हजार ६५८ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
  • पीक नुकसानीसाठी मदत
बुलढाणा: जून आणि जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला. जिल्ह्यासाठी तब्बल १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची सर्वाधिक मदत मंजूर झाली. जिल्ह्यातील ७ हजार ६५८ बाधित शेतकऱ्यांच्या ५ हजार ४८९.९१ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी ही मदत मिळणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

Buldhana News: जिल्हा बँक निवडणुकीचा फैसला; ९४ टक्के मतदान; अनेक मान्यवरांनी बजावला आपला मताधिकार

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला. बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मंजूर झालेली १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची मदत ही राज्यासाठी मंजूर झालेल्या एकूण निधीतील मोठा हिस्सा आहे. त्यामुळे खरीप हंगामातील नुकसानीने आर्थिक अडचणीत आलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंजूर झालेला निधी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी निश्चितच आधार देईल, असे मंत्री मकरंद जाधव यांनी सांगितले.

मदत थेट खात्यात; जुन्या कर्जासाठी वळती करता येणार नाही बाधित

शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही मदत रक्कम शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाच्या परतफेडीसाठी अथवा वसुलीसाठी वळती करून घेऊ नये, अशा कडक सूचना सर्व बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत पूर्णपणे त्यांच्या उपयोगासाठी उपलब्ध होणार आहे.

दुबार लाभ टाळण्याच्या सूचना

मदत वाटप करताना एकाच शेतकऱ्याला एकाच नुकसानीसाठी दुबार लाभ मिळणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसीलदार व जिल्हाधिका-याना देण्यात आल्या आहेत, त्याच हंगामात यापूर्वी मदत मिळालेल्या लाभार्थ्यांना त्याच क्षेत्रासाठी पुन्हा मदत देताना द्विरुवती होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी आणि वितरित मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

बुलढाण्याला मोठा आधार

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्हातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत ७हजार ६५८ शेतक-यांसाठी मंजूर झालेला १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांचा निधी हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतक-यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना खरीप हंगामातील नुकसानीतून सावरण्यासाठी मदतीचा हात मिळाला आहे.

बुलढाण्याचे पालकमंत्री, मकरंद जाधव पाटील म्हणाले की, ८८ शेतकयांच्या हिताला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानसास्त शेतक-यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

Web Title: Buldhana farmers flood relief fund crop damage compensation 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Aid to Farmers
  • buldhana news
  • Farmer Loan Waiver
  • flood

संबंधित बातम्या

Buldhana: ‘जिगाव ‘साठी ३५ हजार कोटी द्या; केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे ना. प्रतापराव जाधव यांची मागणी
1

Buldhana: ‘जिगाव ‘साठी ३५ हजार कोटी द्या; केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे ना. प्रतापराव जाधव यांची मागणी

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
2

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल
3

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल

Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात
4

Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.