अमरावती : धारणी शहरातून एका अल्पवयीन मुलीला बुरखाधारी महिलांनी पळवून नेले असून, मुलीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार लव्ह जिहादचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार वजा निवेदन कमल मालविय यांनी पोलीस अधीक्षक यांना गुरुवारी दिले आहे.
मुलीचा जीव धोक्यात
निवेदनानुसार, धारणीतील एका मुलीला बुरखाधारी महिलांनी अपहरण करून अज्ञास स्थळी नेण्याची शक्यता आहे. गरिब कुटुंबातील या मुलीला वडिल नसून केवळ आई आहे. या मुलीला फुस लावून व दबावतंत्राचा वापर करून पळून नेले असून, हे प्रकरण लव्ह जिहाद असण्याची शक्यता असून, मुलीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडवून पळवून नेण्यात एक १९ वर्षीय तरुण जबाबदार आहे. मुलगा हा विशेष समुदयातील असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ दखल घेऊन मुलीला सुरक्षितरित्या बाहेर काढावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनदेतेवेळी भाजपाचे शिवराय कुलकर्णी, शिवसेनेचे सुनील खराटे, कमल मालवीय, पवन जयस्वाल यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.
प्रेमाच्या जाळ्यात अडकविले
विशेष समुदयातील दोन तरुणांनी दोन आदीवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाची मागणी केली आहे. या संदर्भात रजिस्टर मॅरेज कोर्टातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या दोन्ही मुली चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील असल्याचे निवेदनात म्हटले आहे.






