जळगाव : मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड आणि आता प्रसाद लाड (Koshyari, Mangalprabhat Lodha and Sanjay Gaikwad, Prasad lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, यावर मोठा वाद निर्माण झाला होता.
[read_also content=”समृद्धी महामार्गाची पाहणी करत असताना, जालन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखवले काळे झेंडे https://www.navarashtra.com/maharashtra/while-inspecting-the-samruddhi-highway-cm-and-dcm-displayed-black-flags-in-jalna-350810.html”]
त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती, असं विधानं केलं आहे, मग मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड आणि आता भाजपा आमदारा प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म शिवनेरीवर झाला नसून, कोकणात झाला आहे. आणि महाराजांचे बालपण रायगडावर गेले आहे, असं म्हटलंय. यानंतर राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून भाजपाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
दरम्यान, यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राज्य सरकार तसेच भाजपाला इशारा दिला आहे. वारंवार महाराजांचा अपमान होत असले तर, मंत्रिपद गेलं खड्यात मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो…पण महाराजांचा अपमान सहन करणार नाहीय, असा गर्भित इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तसेच थेट मंत्रीपद सोडण्याचाही इशारा पाटील यांनी दिला आहे. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे करु शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजारांवर बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही. शिवरायांबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल. तर आम्ही ऐकून घेणार नाहीय, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्याला माफ केले जाणार नाही, अशा इशारा मंत्री पाटील यांनी दिला आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केले. त्याचा तीव्र निषेध होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनाही या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मंत्रीपद गेलं खड्ड्यात…पण शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.