मुंबई – सप्टेंबर-२०२३ महिन्यासाठी मध्य रेल्वेचे (Central Railway) मालवाहतूक ५.७६ दशलक्ष टन होती, तर सप्टेंबर-२०२२ महिन्यासाठी ५.६५ दशलक्ष टन लोडिंग होते, त्यात १.९०% ची झालेली वाढ, सप्टेंबरच्या कोणत्याही महिन्यातील सर्वोत्तम लोडिंग आहे. मध्य रेल्वेने एप्रिल-सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीसाठी ४१.६६ मेट्रिक टन लोडिंग नोंदवली आहे, जी एप्रिल-सप्टेंबर-२०२२ मध्ये ३७.९९ मेट्रिक टन पेक्षा ९.७०% ची झालेली वाढ, मध्य रेल्वेवरील आतापर्यंतची सर्वोत्तम आहे. वार्षिक प्रारंभिक लोडिंग देखील आहे. (Central Railway handled 5.76 million tonnes of freight in September; In which an income of Rs.6.10 crores was reported)
सप्टेंबरमध्ये ६१० कोटी रुपयांचा मालवाहतूक
दरम्यान, नेट टन किलोमीटर (NTKM) सप्टेंबर-२०२२ च्या ३२०३ दशलक्षच्या तुलनेत सप्टेंबर-२०२३ मध्ये ६.०५% ने वाढून ३७१५ दशलक्ष झाले आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२२ मधील ५७१ कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये ६१० कोटी रुपयांचा मालवाहतूक महसूल मिळवला.
विशेष गाड्या…
मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२३ मध्ये गणपती, वेलकन्नी आणि ओणम स्पेशल गाड्यांसह ३५३ विशेष प्रवासी गाड्या चालवल्या. मध्य रेल्वेने १० पूर्ण शुल्कासह दर (FTR) विशेष गाड्या चालवल्या. मध्य रेल्वेने लीज पार्सल सर्व्हिसेस मधून रु. २.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. यामध्ये
00113 मुंबई ते संकराईल गुड्स यार्ड (पश्चिम बंगाल) ८ सेवा, भिवंडी/जळगाव/नागपूर ते आजरा (आसाम) ३ सेवा, गोधनी/कलमेश्वर ते न्यू तिनसुकिया (आसाम) २ सेवा, सावदा ते आदर्श नगर दिल्ली- १ सेवा आणि देहू रोड-बाडमेर (राजस्थान) १ सेवा चालविण्यात आल्या.