छगन भुजबळ यांनी शपथ घेताच भाजपने त्यांच्याविरोधात केलेल्या १०० कोटींच्या घोटाळ्यांची पोस्ट व्हायरल
Chhagan Bhujbal Oath Ceremony: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांचे आमदार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. पण छगन भुजबळ यांच्या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एकेकाळी छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप मंत्री एकाच मंत्रीमंडळात असतणार आहेत.
या सगळ्यात २०१९ साली छगन भुजबळांविरोधात भाजपने केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. छगन भुजबळ यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप करण्यात आलो होते. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हीच पोस्ट आता पुन्हा व्हायरल होऊ लागली आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप झाले, या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कारभार होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या या खात्याची जागा रिकामीच होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्पुरत्या स्वरूपात स्वत:कडे घेतला. त्यानंतर कालरात्री अचानक मंत्रिमंडळात काही घडामोडी घडल्या आणि छगन भुजबळ यांच्या शपथविधीची घोषणा करण्यात आली. आज सकाळी राजभवनात त्यांनी मंत्रीपदाची शपथही घेतली.
छगन भुजबळ यांनी स्वत: कोणतही खातं मिळालं तरी चालेल, अशी जाहीर भूमिका मांडली असतील तर त्यांना धनंजय मुंडेंचे अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याचीच दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पण दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर हॅंडलवर महाराष्ट्र भाजपच्या अकाऊंटवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे.
Share Market Closing Bell: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद, सेन्सेक्स – निफ्टीही कोसळला
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. या त्रिसदस्यीय आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वरिष्ठ नेते छगन भुजबळ मंत्री म्हणून मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. मात्र, याच काळात छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोप होऊ लागले. भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने लक्ष्य करण्यात आलं. भाजपकडून त्यांच्या विरोधात प्रचारात्मक पद्धतीने टीका करण्यात येत होती. याच दरम्यान, महाराष्ट्र भाजपाने एक पोस्ट प्रसारित करून भुजबळांवर निशाणा साधला होता.
महाराष्ट्र सदन घोटाळा – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा केला होता.
या प्रकरणात त्यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ देखील आरोपी होते.
#विसरला_नाही_महाराष्ट्र
#आघाडी_बिघाडी
@NCPspeaks
२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आले. मात्र, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने भुजबळांवर जोरदार टीका करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Get Ready For War… जबरदस्त ॲक्शन अन् हृतिक- ज्युनियर एनटीआर अफलातून जुगलबंदी; ‘वॉर २’चा धमाकेदार
महाराष्ट्र भाजपने त्यावेळी एक पोस्ट आणि त्यासोबत सविस्तर माहिती असलेला फोटो प्रसारित केला होता. या पोस्टमध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा केला होता. नवीन महाराष्ट्र सदनाची किंमत १०० कोटींपेक्षा अधिक वाढवण्यात आली. असा आरोप करण्यात आला.
ईडीची चौकशी: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या चौकशीत भुजबळ यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली. याशिवाय, त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे सुमारे २६०० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचे निदर्शनास आल्याचे भाजपच्या पोस्टमध्ये नमूद होते.
महाराष्ट्र सदन घोटाळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा केला होता.
या प्रकरणात त्यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ देखील आरोपी होते.#विसरला_नाही_महाराष्ट्र#आघाडी_बिघाडी@NCPspeaks pic.twitter.com/g6bWzYBzeN— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 9, 2019