War 2 Teaser Released Features Hrithik Roshan Jr. NTR And Kiara Adwani
चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे… टॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवशी (Jr. NTR Birthday) ‘वॉर २’ चा धमाकेदार टीझर (War 2 Teaser) अखेर रिलीज झाला आहे. चाहते गेल्या अनेक दिवसापासून चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘वॉर २’ चा टीझर रिलीज झाला असून फक्त तीन तासांतच युट्यूबवर चित्रपटाच्या टीझरला जबरदस्त व्ह्यूज मिळाले आहेत. ३० लाखाच्या आसपास चित्रपटाच्या टीझरला व्ह्यूज मिळाले आहेत.
एकेकाळी ९४ किलो वजन ज्युनियर NTR ला विद्रुप म्हटले जायचे, पण राजामौलीने आयुष्य बदललं
टीझर विषयी बोलायचे तर, “केव्हापासून कबीर तुझ्यावर माझी नजर आहे. तू भारताचा सर्वोत्तम सैनिक आणि रॉ चा बेस्ट एजंट सुद्धा होतास, पण आता नाहीयेस.” अशा डायलॉगनेच टीझरची सुरुवात होतेय. हा आवाज ज्यु. एनटीआरचा आहे. अभिनेता पुढे हृतिकला बोलतो, “तू मला ओळखत नाहीये, पण लवकरच मला ओळखशील. Get Ready For War…” हा डायलॉग बोलल्यानंतर ज्यु. एनटीआर आणि हृतिक रोशनमधली मारामारी आणि जबरदस्त ॲक्शन त्यासोबतच दोघांचीही जुगलबंदी या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘वॉर २’मध्ये ज्यु. एनटीआरचा केव्हाही न पाहिलेला लूक दिसत आहे.
पुढे टीझरमध्ये हृतिक रोशनची जबरदस्त एन्ट्री होताना पाहायला मिळते. तो टीझरमध्ये भेडियासोबत (कोल्हा) एन्ट्री घेताना दिसतोय. ‘वॉर २’च्या माध्यमातून ज्यु. एनटीआर आणि हृतिक रोशन हे दोघंही पहिल्यांदाच एकत्रित स्क्रीन शेअर करणार आहेत. दोघंही एकमेकांच्या विरोधी भूमिकेत आहेत. टीझरमध्ये कियारा अडवाणीही पाहायला मिळत आहे. तिचा सुपर बोल्ड लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कियाराचा हटके अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन पहिल्यांदाच एकत्रित समोरासमोर येणार असल्यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असल्याचे दिसत आहे.
नॅन्सी त्यागीने कान्समधील लुक केला कॉपी? नेहा भसीनने फॅशन इन्फ्लुएंसरवर केले आरोप, दाखवले पुरावे
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ चित्रपट येत्या १४ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरसोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. टॉलिवूड अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या ४२ व्या वाढदिवशी हृतिक रोशनने एनटीआरच्या चाहत्यांसाठी खास सरप्राईज दिलेलं आहे. टीझर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून टीझरमधून चाहत्यांना हृतिक रोशनची ओळख मिळाली आहे. चित्रपटात हृतिकने कबीर नावाचे पात्र साकारलेय. दरम्यान, ‘वॉर २’च्या टीझरचे चाहत्यांकडून जबरदस्त कौतुक केले जात आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेमध्ये रिलीज होणार आहे.