फोटो सौजन्य : गुगल
या गावांमध्ये होणार भूसंपादन
संबंधित गावांतील गट क्रमांकांची मोजणी निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे. यामध्ये गादेजळगाव, सातारा, कुंभेफळ, वरुड काझी, फतेपूर, करंजगाव, मुस्तफाबाद, करमाड, शैदा जहांगीर, सातारा, लाडगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा दक्षिण, चिकलठाणा, मुर्तुजापूर, हसनाबादवाडी, देमणी, शेकटा, शहानूरवाडी, गारखेडा आदी गावांचा समावेश आहे.
अमरावतील ६२७ रुग्णांना ५.२८ कोटींची मदत! आरोग्यसेवेला मिळणार गती; मुख्यमंत्री निधीतून गरजूंना दिलासा
गारखेडा येथून मोजणीला सुरुवात
संबंधित गावांतील गट क्रमांकांची मोजणी निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोजणी मोहीम ३० एप्रिल रोजी गारखेडा येथून सुरू झाली असून 20 मे रोजी शाहूनगरवाडी व गारखेडा येथील कामकाजाने पूर्ण होणार आहे. विविध गावांसाठी 5, 6, 8, 11, 13, 14, 15 आणि २० मे अशा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित जमिनीचे मालक, धारक व नागरिकांनी मोजणीच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मोजणी प्रक्रियेदरम्यान सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने राबविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, यामुळे पुढील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






