छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना नामांकन (फोटो - istockphoto)
Unesco World Heritage List: छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि त्याचे जतन केले जावे अशी मागणी नेहमीच होत असते. आता राज्य सरकारने या बाबत पुढाकार घेतला आहे. स्वराज्यातील 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार आता वेगाने हालचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसाचा दर्ज मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी यूनेस्कोमधील भारतीय राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून आम्ही पॅरिसला दाखल झालो आहोत. आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशालजी शर्मा यांना आम्ही भेटलो. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशालजी यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या राजे शिव छत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून आम्ही पॅरिसला दाखल झालो आहोत. आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशालजी शर्मा यांना आम्ही भेटलो. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशालजी… pic.twitter.com/14QhwAJHjT
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 23, 2025
त्यावर पूर्णपणे निर्णय होणे बाकी आहे, त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन उपस्थित होत्या.
महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी लष्करी भूप्रदेश या अंतर्गत प्रस्ताव सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ पॅरिसमध्ये गेले आहे. हे शिष्टमंडळ पॅरिसमध्ये या किल्ल्यांना जागतिक वारसा हा दर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे,
या किल्ल्यांमध्ये राजधानी रायगड, उपराजधानी पन्हाळा राजगड, प्रतापगड, शिवनेरी , लोहगड, साल्हेर, लोहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी किल्ला अशा 12 किल्ल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळचे नेतृत्व सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार करत आहेत. तसेच या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे, वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.