मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गटातून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या आमदार संजय राठोडांचा (Sanjay Rathod) समावेश आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये (Pooja Chavan Case) देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. आता त्याच राठोडांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
[read_also content=”राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/ajit-pawar-reaction-about-maharashtra-cabinet-expansion-nrsr-313920.html”]
सर्वांना माहिती आहे की, पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला. त्या तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आली. त्यामुळेच राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. यानंतरही कुणाचे काही विचार असेल, म्हणणं असेल तर नक्की सांगा, ते ऐकून घेतलं जाईल. लोकशाहीत प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.