चिपळूण-कराड मार्ग वाहतुकीला बंद (फोटो- सोशल मिडिया)
पाटण: गेले एक दोन दिवस राज्यभरात अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात देखील तूफान पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे चिपळूण-कराड मार्गवारील वाहतूक ठप्प झाली आहे. पाटण तालुक्यातील एक पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.
चिपळूण-कराड मार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने वाहूतकीवर परिणाम झाला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक थांबवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्याकडे जाण्यासाठी कोणता मार्ग वापरावा – चिपळूणमधून पुण्याला जाण्यासाठी भोर घाट, ताम्हिणी घाट या मार्गांचा वापर करावा.
कोल्हापूरला जाण्यासाठी कोणता मार्ग वापरावा – कोल्हापूरला जाण्यासाठी प्रवाशांनी रत्नागिरी किंवा देवरुख मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सातारा जिलहीतील काही भगात अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. चिपळूण कराड मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू होते. या परिसरात दरवर्षी अति ते अति मुसळधार पाऊस होतो. मात्र आता पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याने चिपळूण कराड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे.
पूल वाहून गेल्याने एसटी देखील ताम्हिणी घाट मार्गे पुण्याकडे सोडण्यात आली आहे. तर कोल्हापूरला जाण्यासाठी रत्नागिरी आणि देवरुख मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुण्यात पावसाची ‘तूफान’ फटकेबाजी
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पानी साचल्याचे पाहायला मिळाले. आज देखील पुणे शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडणे, भिंती कोसळणे अशा घटना घडल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोथरूडमधील धनंजय सोसायटी आणि पाटील इस्टेट भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील खराडी परिसरात सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबले आहे.
Pune Rain News: पुण्यात पावसाची ‘तूफान’ फटकेबाजी; कोथरूडमध्ये घरात पाणी घुसले तर…
राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. परिणाम महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या बहुतेक भागात सतत पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे रुळांपासून ते घरांपर्यंत पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगडसारख्या किनारी जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.