दिवाळीच्या मुहूर्तावर सिडको कडून आज घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणार्यांसाठी सिडकोकडून ही खूषखबर आहे. सिडकोने 7849 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. ही घरं उलवे नोड मधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व या भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हा प्रकल्प ‘परिवहन केंद्रित विकास’ या संकल्पनेवर आधारित आहे. 25 ऑक्टोबर पासून या प्रकल्पासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तर 19 जानेवारी 2023 दिवशी या घरांसाठीचा निकाल देखील जाहीर केला जाणार आहे.
सिडकोच्या या दिवाळी विशेष जाहीर करण्यात हाऊस लॉटरी मध्ये ऑनलाईन अर्ज नोंदणी 25 ऑक्टोबर ते 22 डिसेंबर 2022 करता येणार आहे. तर अर्ज सादर करण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 23 जानेवारी पर्यंतचा वेळ असणार आहे. या घरांसाठीच्या सोडतीचा निकाल 19 जानेवारी2023 दिवशी जाहीर केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. lottery.cidcoindia.com या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हांला ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाचे शुल्क भरण्यासाठी 23 डिसेंबर 2022 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.