तुंगार्ली धरण हे लोणवळा शहारत येणाऱ्या पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण स्थळ आहे. येथील संथ निळे पाणी, धरणाच्या पाण्याला लागूनच असलेले हिरवेगार डोंगर, शांत आणि रमणीय परिसर पर्यटकांसोबतच स्थानिक नागरिकांना देखील आकर्षित करून घेत असतो. मात्र पर्यटकांच्या सोबत याठिकाणी कचरा देखील वाढत जातो. तुंगार्ली गावातील स्थानिक ओमकार तरुण मंडळ वर्षातून किमान दोन वेळा नगरपरिषदेच्या सहकार्याने याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून हा कचरा साफ करत असते. त्यामुळे नगरपरिषदेने आवाहन करताच ओमकार तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
-प्लास्टिक कचरा, काचेच्या बाटल्यांचे संकलन
नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, राजू बच्चे, प्रमोद गायकवाड, सुधीर शिर्के, माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, विशाल पाडाळे, विशाल विकारी, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, शिवाजी मेमाणे, शरद कुलकर्णी, यशवंत मुंडे, वैशाली मठपती, दत्ता सुतार यांच्यासह नगरपरिषद अधिकारी तसेच सर्वच खात्याचे कर्मचारी या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते. धरणाची मुख्य भिंत परिसर तसेच धरणाच्या बँक वॉटर परिसरातील प्लास्टिक कचरा, रिकाम्या तसेच फुटलेल्या काचेच्या बाटल्या आदी मोठ्या प्रमाणात जमा करून ते सर्व कचराडेपोवर पाठवण्यात आले.