देशमुख कुटुंबाने घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहेत. विरोडक मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अया प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीद्वारे केला जात आहे. पोलिसांनी आरोपिना अटक केली आहे. दरम्यान देशमुख कुटुंबाने आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान आज देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कडक शासन करण्यात येईल. ज्यामुळे गुन्हेगारांना एक संदेश मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला दिले आहे. जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना माफी नाही. या प्रकरणात जो कोणी असेल त्याला शिक्षा मिळेल, असे फडणवीस म्हणाले. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘आमच्याकडे जे काही पुरावे होते, ते आम्ही मुख्यमंत्र्यांना दाखवले आणि त्यावर चर्चा केली. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे होयला हवा अशी आमची भूमिका आहे. एफआयआरमध्ये ज्या गोष्टी आहेत, त्यामधील सर्वांचे सीडीआर तपासावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.’
हेही वाचा: Dhananjay Munde News: राजीनामा देणार का? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
राजीनाम्यावर धनंजय मुंडे काय म्हणाले?
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, धनंजय मुंडेंविरोधात ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय देशमुख न्यायालयातील याचिका मागे घेणार
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या जवळपास सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या सगळ्यात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी धनंजय देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय धनंजय देशमुख यांनी घेतला आहे.