करुणा शर्मा यांची धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध हायकोर्टातधाव (फोटो- टीम नवराष्ट्र)
बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर चांगलेच चर्चेत आले आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. वाल्मीक कराड हा मुंडे यांचा जवळचा असल्याचा आरोप करत मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या विरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे.
करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लवपल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणाची माहिती लवपली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. संतोष देशमुख प्रकरणात आधीच अडचणीत असलेले धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
हायकोर्टात याचिका दाखल
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली असल्याचा आरोप करत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणाची माहिती लवपली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी याचिकेतून केला आहे.
हेही वाचा: Dhananjay Munde News: राजीनामा देणार का? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
बीड प्रकरणात संभाजीराजे छत्रपती कडाडले
मंत्री धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंडे राजीनामा देणार का अशी चर्चा सुरू होती. मात्र मी राजीनामा दिलेला नाही असे आज मुंडे म्हणाले. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर टीका केली आहे. संतोष देशमुखी यांच्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटावे लागते हे दुर्दैव आहे. जोवर संतोष देशमुख यांना नये मिळत नाही आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार आहे.
हेही वाचा:Santosh Deshmukh: अंजली दमानियांनी घेतली फडणवीसांची भेट; केल्या ‘या’ मागण्या, कोणाच्या अडचणी वाढणार?
राजीनामा देणार का? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, धनंजय मुंडेंविरोधात ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.