मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
आज आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न
अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
Devendra Fadnavis On Marathwada Mukti Sangram Din: आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. यानिमित कार्यक्रमाला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र त्यांचे भाषण सुरू असताना काही लोकांनी तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या लोकांना चांगलेच सुनावले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होते. तेव्हा काही लोकांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी सुरू ककेली. आरक्षणाच्या विषयावरून ही घोषणाबाजी केली जात होती.
🔸CM Devendra Fadnavis hoisted the national flag in Chhatrapati SambhajiNagar on the occasion of Marathwada Liberation Day, where he was accorded a Guard of Honour.
Minister Sanjay Shirsat and other dignitaries were present.🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा… pic.twitter.com/Vmp1tvcADA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 17, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. हैदराबाद गॅझेट रद्द करावे अशी घोषणा बाजी करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. आजच्या या महत्वाच्या दिवशी कार्यक्रम सुरू असताना काही लोक या ठिकाणी येऊन घोषणाबाजी करतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्यसेनानींचा अपमान असू शकत नाही. परमेश्वर त्यांना सुबुद्धी देवो. चार लोक येतात, घोषणाबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही. मी त्याबद्दल काही बोलणार नाही.
आजपासून बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ
आज मराठवाड्यातील बीडमध्ये रेल्वेच नाही तर विकास वाहिनीही पोहोचली आहे, ज्याद्वारे विकासाची अपेक्षित गती साध्य होईल. बीडमध्ये सुरू झालेल्या रेल्वेचे लोकार्पण गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. बीड ते अहिल्यानगर अशी रेल्वे सुरू झाली असून त्या गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हाला दिशा दाखवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना मी वंदन करतो. आज आपल्या जनतेचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. केशरकाकू क्षीरसागर, गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वेचे स्वप्न बघितलं. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, आम्ही गोपीनाथराव मुंडे यांना ही रेल्वे अर्पण करत आहोत. रेल्वे संघर्ष समितीचेदेखील मी अभिनंदन करतो. या रेल्वेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे.”