मोठी बातमी ! मुंबईतील 'या' दर्ग्यावर सरकार चालवणार बुलडोझर; फडणवीस सरकारने दिला अल्टिमेटम (फोटो- सोशल मिडिया)
Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मात्र या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा दांडी मारली. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची मान्यताही देण्यात आली आहे. त्याशिवाय जळगाव, पुणे यासह इतर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वीच कॅबिनेटचा अजेंडा बाहेर आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले असल्याचे पाहायला मिळाले.
मंत्रिमंडळ बैठकीत येणारे विषय आधी सार्वजनिक केले जातात. माध्यमांमध्ये याबाबत चर्चा केली जाते. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आहेत. याबाबत फडणवीस यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. तसेच यानंतर कॅबिनेट बैठकीचा अजेंडा हा सार्वजनिक करू नये, अशा स्पष्ट सूचना फडणवीस यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीआधी अजेंडा बाहेर येत असल्याने फडणवीस नाराज झाले. त्यांनी याबाबत मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. तसेच त्यांना त्यांनी घेतलेल्या गुप्ततेची आठवण देखील करून घेतली. या पुढे हे प्रकार थांबले नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. मंत्रिमंडळ अजेंडा बैठकीआधी छापणे हे चुकीचे आहे. याबाबत मी मंत्ऱ्याना सांगितले आहे. मंत्र्यांनी आपल्या कार्यालयांना बैठकीपूर्वी अजेंडा न छापण्यासाठी सांगितले पाहिजे. अन्यथा मला कारवाई करावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय
जलसंपदा विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी सहा निर्णय घेण्यात आले आहे. फडणवीस सरकारकडून डान्स बारचा कायदा आणि इतर आज मोठे निर्णय घेण्याची शक्यता होती. पण तसा कोणताही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला नाही.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
• म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
• अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)
• सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
• राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
• जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
• पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)