संग्रहित फोटो
मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या राज्यात बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान, यावर आता विरोधक आक्रमक होत शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde fadnvis government) टिका करत आहेत. सरकारच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन काढत असताना, आता वेदांतप्रकरणी एक मोठी घडामोड समोर येत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मध्यम-लघू-सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे (Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Narayan Rane) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra modi) भेट घेणार आहेत.
[read_also content=”गुलाम नबी आझाद यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी https://www.navarashtra.com/india/gulam-nabi-azad-death-threats-from-social-media-326111.html”]
दरम्यान, या तिघांची मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर एक बैठक पार पडली. या बैठकीत वेदांताबाबत खलबंत झाल्याची माहिती समोर येतेय, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे. त्यामुळं वेदांता महाराष्ट्रात पुन्हा येणार का, पंतप्रधान मोदी गुजरातला गेलेला वेदांता प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात पाठवतील का, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.