शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची पुष्टी, वैभव नाईक यांची कारवाईची मागणी
भगवान लोके, कणकवली: राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींवर कारवाई करा अशी मागणी केली होती. मात्र महायुतीच्या भ्रष्टाचारी सरकारने, पोलिसांनी आपटे आणि पाटील या दोघांना अटक केली. मात्र तिसऱ्या व्यक्तीची चौकशी किंवा कारवाई झालेली नाही. सरकारच्या अहवालानुसार भ्रष्टाचार झाल्याची पुष्टी मिळाली आहे. दोषींवर कोणत्याही परिस्थित कारवाई झालीच पाहिजे. याप्रकरणी आमदार वैभव नाईकांनी सरकारला धारेवर धरले आहे. ज्यांच्यावर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आमच्याकडे पुरावे मागताहेत असा उपरोधक टोला ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी लगावला.
हे देखील वाचा: विधानसभेपूर्वी राज ठाकरे ॲक्शनमोडमध्ये; विदर्भ दौरा करुन घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक
कणकवली येथे नाईक पत्रकारांशी संवाद साधत होते. या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणात 14 पानांचा अहवाल तयार झाला आहे. त्या अहवालात भ्रष्टाचाराची पुष्टी देण्यात आली आहे. या दुर्घटनेत बील अदा करण्यापूर्वी त्यावर चर्चा होण्याची गरज होती. तसेच हा अहवाल शासनाने अगोदर जाहीर करण्याची गरज होती. या अहवालानुसार दोषींवर कारवाई झाली. हा पुतळा उभारताना लोकल कामगार घेऊन काम केलं गेलं. ते अहवालात उघड झाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हाव , ही आमची मनोमन इच्छा आहे. पण सरकारच्या विरोधात रोष असल्याने ते घाईगडबडीने पुतळा उभारण्याचं काम हाती घेत आहेत. अशी टीकावैभव नाईक यांनी केली.
या दूर्घटनेनंतर सरकारने केलेला भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणला म्हणून आम्हाला पोलीस चौकशीसाठी नोटीस बजावत आहेत. पोलीसांना खऱ्या अर्थांने या दोन आरोपींव्यतीरिक्त अन्य जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पोलीसांनी कितीही नोटीसा दिल्या तरी आम्ही चौकशीला सामोरे जावू आणि भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत त्याचा उलघडा आम्ही जनतेसमोर करु, असा इशारा वैभव नाईक यांनी सरकारला दिला आहे.