''मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी''; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरून वडेट्टीवारांची जहरी टीका
कसलं ते मंगेशकर कुटुंब. ते म्हणजे लुटारुंची टोळी. त्यांच्यापैकी कोणी कधी दान केलं पाहिलं आहे का? चांगलं गाणं म्हटलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लतादिती, आशादीदी, हे दीदी ते दीदी. यांनी लोकांसाठी आणि देशासाठी काय केलं? तेवढं जर समर्पण लोकांसाठी आणि देशासाठी असतं तर देशाची सेवा केली असती. खिलारे पाटील यांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही यांनी. ही कसली माणुसकी, हे तर माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे.
अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून, लूट चालवून जर गरिबांचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर हे कलंक आहे. यांनी कोणी साथ देऊ नये,यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. चॅरिटी म्हणून योजनांचा फायदा घ्यायचा आणि मग गरिबांना लुटायचं. हे धंदे बंद झाले पाहिजे.