हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: हर्षवर्धन सपकाळ ही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांनी आह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, भाजप आणि इंडिया आघाडीवर देखील भाष्य केले आहे. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे.
महाराष्ट्र कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष झाल्यावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आमच्यामध्ये चांगली चर्चा झाली आहे. महराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे. महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल. मात्र भारतीय जनता पक्ष धर्म आणि देश बुडवायला लागली आहे. आज संघर्षाची वेळ आहे.”
“भाजप लोकशाही बुडवायला निघाली आहे. त्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. शिवसेना आणि कॉँग्रेस ही सोबत कसे राहतील याबाबत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेणे महत्वाचे होते”, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
“महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेण्याचा आमचा विचार आहे. लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडी देखील एक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कक्षा लढवाव्या यावर चर्चा झाली, असे सपकाळ म्हणाले.
राहुल गांधींचा ताफा अडवल्याने काँग्रेस आक्रमक; प्रदेशाध्यक्ष सपकाळांची भाजपवर जोरदार टीका
राहुल गांधींचा ताफा अडवल्याने काँग्रेस आक्रमक
ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जातनिहाय जनगणना ही केवळ शिरगणती नाही तर सामाजिक अजेंडा आहे. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या २७ वरून वाढून ६४ टक्क्यापर्यंत जाऊ शकते. या जनगणनेमुळे प्रत्येक समाज घटकांची लोकसंख्या किती हेही समजेल, पाटीदार, गुर्जर, मराठा आरक्षणाचा प्रश्नही यामुळे सुटण्यास मदत होईल. भाजपा सरकारला जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला याचे सर्व श्रेय राहुल गांधी यांना जाते, त्यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. सरकारने याची प्रक्रिया काय आहे? माहिती कशी जमा करायची? याचे प्रशिक्षण कर्मचारी अधिकारी यांना दिले पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.