संग्रहित फोटो
मुंबई : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. अशातच आता नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी यांचा यात समावेश आहे.
या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक, रजनी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, आमदार अमित देशमुख, के. सी. पाडवी, खासदार वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख, आमदार डॉ. विश्वजित कदम, एम.एम. शेख, मुजफ्फर हुसेन, रणजित कांबळे, माजी मंत्री रमेश बागवे, राजेंद्र मुळक, आमदार भाई जगताप, आमदार साजीद खान पठाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत पुरके, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, एस सी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे अध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख आदींचा या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन
बिहार विधानसभेचे निकाल उलटे लागले असते तर आजचा उत्साह अधिक वाढला असता पण पराभव झाला म्हणून खचून जावू नका. काँग्रेस कार्यकर्त्याने पुन्हा नव्या जोमाने व ताकदीने कामाला लागले पाहिजे. रडायचे नाही तर लढायचे हा बाणा अंगी बाळगला पाहिजे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजयी झेंडा फडवण्यासाठी ताकदीने कामाला लागा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.






