शिरोली : मालवाहू कंटेनर रत्नागिरीहून सादळे-मादळे मार्गाने राष्ट्रीय महामार्ग टोपकडे जात असताना सादळे गावच्या पुढे वळणावर (Accident in Shiroli) आला असता चालकाने ब्रेक मारला. त्याचवेळी कंटेनर वळण घेऊन दक्षिण दिशेला कठड्यावरुन 50 फूट खोल दरीमध्ये कोसळला. यामध्ये कंटेनरचे नुकसान झाले असून, चालक किरकोळ जखमी झाला आहे.
कासारवाडी सादळे मादळेल घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटरस्ता व दरीच्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे मजबूत संरक्षण कठडे, बांधणे व वळणावर दिशादर्शक फलक लावणं गरजेचं बनलं आहे. हॉटेल ग्रीन व्हॅली ते सादळे जुणा आडपर्यंतच्या दक्षिण दिशेला मोठी खोल दरी आहे. हा रस्ता वळणामुळे वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
एखाद्या वाहनावरील चालकांचा ताबा सुटल्याने मोठा अनर्थ घडू शकतो, हे टाळण्यासाठी बांधकाम विभागाने सिमेंट काँक्रीटचे मजबूत संरक्षण कठडे बांधणे अनिवार्य आहे.