अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कापूस पीक वाया गेले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Monsoon: भोकरदन : पावसाच्या तडाख्याने हातची रूबी पिके कुजून गेलीत. हातातोंडाशी आलेली खरीप हंगामी उभी पिके वाया जाऊ लागली आहेत. परिणामी, पावसाच्या तडाख्याने शेतकरी देशोधडीला लागला जात आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत असून, त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. सुगीला परतीच्या पावसाचा तडाखा बसत आहे. परिणामी, शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामी मका, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांची काढणी-मळणी ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे सुगीला अवकाळीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत असुन तडाखा बसला जात असल्याने उभी पिके कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बहुतांश भागात पिके सध्या झडण्याच्या स्थितीत आहेत.
हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची शक्यता
पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, ऐन सुगीच्या हंगामात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. शनिवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाने हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात दिवाळीनंतर सुगीच्या कामांना वेग येणार होता. खरीप पिके कापणीस सज्ज होती. परंतु, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अखंड पावसाने शेतकऱ्यांचे सर्व नियोजन विस्कळीत केले आहे. शिवारात पाणी साचल्याने पिके झुकली असून, दाणे झडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
अवकाळी पावसाने सर्वाधिक कापसाचे नुकसान
भोकरदन तालुका आणि परिसरात परतीचा पाऊस गेल्या आठवल्यापासून रोज पडत असल्याने आता मोठ्या प्रमाणावर फुटलेला कापूस वेचणी अभावी झाडावरच ओला झाला असून जमिनीवर सडा पडल्यासारखा पावसाच्या फटक्याने विखुरला गेला. मका काही ठिकाणी शनिवारच्या पावसात तर शेतातून दुसऱ्या तिसऱ्या शेतात वाहून गेली आहे यानतर मजूर अभावी मोठ्या प्रमाणावर फुटलेला कापूस देखील शनिवारच्या दणके पावसाने पूर्णतः खराब झाला आहे काळवंडला असून हाती आलेली तोडणी वाया गेली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दुपारी ऊन रात्री पाऊस
काही ठिकाणी कापणी केलेले पीक भिजल्याने शेतक-यांना मौठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. गेल्या आठवड्यापासून परिसरात सकाळी ऊन, दुधारी पाऊस असा निसर्गाचा खेळ सुरू आहे. दुपारपर्यंत वातावरण एकदम उष्ण असते त्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन एकदम दमदार पावसाला सुरुवात होते. यंदा वेळेत चांगला पाऊस झाल्याने मका, सोयाबीन, आदी पिके जोमात आली आहेत; परंतु सध्या पिके काढण्याच्या वेळी रोज पाऊस न चुकता हजेरी लावत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तुरीलाही फटका
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने चांगल्या प्रमाणात भरलेल्या आणि फुलीऱ्यात असलेल्या तुर पिकाला देखील या पावसामुळे मोठा फटका बसला आहे काही ठिकाणी तुरीच्या शेंगा परिपक्व होत असताना सततच्या पावसामुळे शेगा झाडून जात आहे याशिवाय दमट वातावरणामुळे तुरीच्या शैगावर अळीचा प्रादुर्भाव देखील काही ठिकाणी जाणवत आहे त्यामुळे या पावसाचा सर्वच पिकांना फटका बसण्याची दिसून येत आहे.






