मुंबई : माजी मंत्री आणि उबाठा गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम यांच्या मालकीच्या खेट येथील साई रिसॉर्टचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरत आहेत. अखेर या वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरू झाले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबद्दलचा व्हिडिओ एक्स वर टाकला आहे. रिसॉर्टचे पाडकाम करत असतानाच अनिल परब आणि सदानंद कदम यांच्यावर फौजदारी कारवाईदेखील होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
अनिल परब चा दापोली साई रिसॉर्ट वर हातोडा
तोडकाम सुरू….साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम विरोधात अनिल परब आणि सदानंद कदम वर फौजदारी कारवाई प्रक्रिया ही सुरू आहे सध्या दोघे जामीनावर आहे
हिसाब तो देना पड़ेगा@BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/uzbnrcfTC4
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) April 3, 2024
किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोन दिवसांमध्ये साई रिसॉर्ट पाडणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरु झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, साई रिसॉर्टचे बांधकाम सीआरझेडच्या नियमाचे उल्लंघन करून बांधण्यात आले आहे. याबद्दल परब यांच्यावर गुन्हा दाखल असून ते जामिनावर बाहेर आहेत. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असताना अनधिकृत आणि अतिरिक्त बांधकाम स्वखर्चाने पाडू, असे प्रतिज्ञापत्र सदानंद कदम यांनी दिले होते.
अनिल परब चा दापोली साई रिसॉर्ट तोडण्याचे काम दोन दिवसात सुरू होणार
आज रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी, SP पोलिस, पर्यावरण विभाग अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली
अनधिकृत रिसॉर्ट बांधकाम आणि CRZ ना बांधकाम विभागात बांधकाम केले म्हणून परब वर गुन्हा दाखल झाला आहे परब जामिनावर बाहेर आहे pic.twitter.com/nu3L8obtNV
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) April 1, 2024
जानेवारी महिन्यात ईडीने साई रिसॉर्टची १० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. याप्रकरणी सदानंद कदम आणि अनिल परब यांच्याविरोधात मनी लाँडरिंगचाही गुन्हा ईडीने दाखल केला होता. केंद्रीय पर्यावरण आणि वन खात्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप केला. या प्रकरणाची चौकशी करत असताना ईडीने सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना अटक केली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने कदम यांना जामीन दिला होता.