मुंबई : एनसीबी मुंबईचे (NCB Mumbai) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना ट्विटरवर ही धमकी आल्याचं माहिती समोर आली आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात (Mumbai Goregaon Police) तक्रार दाखल केली आहे.
[read_also content=”असं ‘काय’ घडलं की आईनंच दिली स्वत:च्या मुलाच्या हत्येची सुपारी! https://www.navarashtra.com/maharashtra/mother-killied-her-son-in-nanded-by-giving-contract-to-killers-nrps-317515.html”]
समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यापासून धमक्या येत आहेत. सोशल मीडियावरून धमक्या देण्यात आल्या आहेत. सध्या या प्रकरणी समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या धमकीच्या ट्विटबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे. वानखडे यांना आरोपीने टॅग करून हा मेसेज केला होता. यावर वानखडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. त्यानंतर काही तासात आरोपीने ते ट्वीट डिलिट केले. तपासात हे अकाऊंट त्याच दिवशी सुरू करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
[read_also content=”७५ जलतरणपटूंनी केले सलग सहा तास जलतरण https://www.navarashtra.com/sports/75-swimmers-swam-continuously-for-six-hours-317516.html”]