मुंबई-गोवा मार्गावरून 'या' वाहनांना दोन दिवस बंदी; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश (फोटो सौजन्य - pinterest)
राज्यातील रस्ते अपघातात वाढ झाल्याने रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यात जानेवारी ते मार्च २०२५ या पहिल्या तीन महिन्यात एकुण ९ हजार ३८५ रस्ते अपघात झाले. त्यात ४ हजार १७९ जणांनी आपला जीव गमावला आहे. तर याच कालावधीत गेल्या वर्षी राज्यात झालेल्या ९ हजार २३१ अपघातांत ४ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई-नागपूर प्रवास वेगवान करणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातातदेखील वाढ झाली आहे. तीन महिन्यात या महामार्गावर ४५ जणांचे प्राण गेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात मात्र मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रस्ते अपघातांमध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग सुरक्षेसंदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना राबविते. परंतु या उपाय योजनांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. मानवी चुकांमुळे ८० टक्के रस्ते अपघात होतात. यात भरधाव वेगाने वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, लेन कटिंग यासारख्या मानवी चुकांचा समावेश आहे.
पत्नीच्या जागी नोकरी करत होता पती; ५५ लाखांचा घोटाळा आला उघडकीस
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सुरक्षित
मुंबई आणि पुणे शहरांदरम्यानचा प्रवास वेगवान होण्यासाठई मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची निर्मिती झाली. एक्सप्रेस वे मुळे दोन्ही शहरांतील प्रवास वेगवान झाला असला तरी अपघात मात्र वाढले होते. हे अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने खास उपाययोजना राबविल्या. वाहनांच्या सुसाट वेगावर नियंत्रण आणले. परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपायांमुळे एक्सप्रेस वे वरील अपघातात आणि मृत्युमध्ये मोठी घट झाली आहे.
अपघातांची आकडेवारी
कालावधी अपघात मृत्यू
जाने ते मार्च २४ ५६ २७
जाने ते मार्च २५ ३५ ०८
राज्यातील ५ वर्षांतील अपघाती मृत्यू
वर्ष अपघात मृत्यू
२०२० २४,९७१ ११,५६९
२०२१ २९,४७७ १३.५२८
२०२२ ३३,३८३ १५,२२४
२०२३ ३५.२४३ १५,३३६
२०२४ ३६,११८ १५,७१५