कल्याण : महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडलो याचा अर्थ आम्ही गद्दार (Traitor) नाही, मी शिवसैनिकच (Shivsainik) आहे. शिवसेना (Shivsena) संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) डाव होता म्हणून आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडून कोणत्या पक्षात विलीन झालो नाही. आम्हाला महाविकास आघाडी नको. महाविकास आघाडीतून बाहेर पडून जर गद्दार ठरवत असतील; तर गद्दाराची व्याख्या काय, हे त्या लोकांनी जाहीर करावे, असे आव्हान शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीत सामील झालेले कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारच्या माध्यमातून शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.
आमदार विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आहेत. शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्याच्या शहरप्रमुख पदाबाबत चर्चा होती. याबाबत बोलताना आमदार भोईर यांनी शहर प्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मी अजूनही शिवसैनिक आहे. उद्धवजी पक्ष प्रमुख आहेत त्यांनी माझी शहरप्रमुखपदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असतील तर ते ठेवतील, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचे भोईर यांनी सांगितले.