• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Deputy Chief Minister Ajit Pawar Has Advised Ncp Workers In Daund

सत्ता आली तरी माज नको अन् गेली तरी…; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

सत्ता आली म्हणून माज करू नका आणि सत्ता गेली म्हणून खचू नका,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना वास्तववादी संदेश दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2025 | 01:56 PM
सत्ता आली तरी माज नको अन् गेली तरी...; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सल्ला
  • अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश
  • दौंडमध्ये अजित पवारांनी विविध मुद्द्यावर केलं भाष्य

दौंड : “सरकार येत असते, जात असते. सगळेच कायम एका ठिकाणी राहतात असे नाही. जसे चार दिवस सासूचे असतात तसेच चार दिवस सुनेचेही येतात. त्यामुळे सत्ता आली म्हणून माज करू नका आणि सत्ता गेली म्हणून खचू नका,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना वास्तववादी संदेश दिला. ते दौंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित ‘जाहीर प्रवेश व संवाद मेळावा’ या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना मान-सन्मान देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, गुरुमुख नारंग, महेश भागवत, तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे माजी दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा, माजी नगरसेवक नंदू पवार, मनोज फडतरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

“दौंड म्हणजे मिनी भारत”

अजित पवार म्हणाले, “दौंड हे महाराष्ट्राला जोडणारे एक महत्त्वाचे जंक्शन आहे. येथे विविध जाती-धर्मांची माणसे गुण्यागोविंदाने राहतात. व्यापारी वर्ग मेहनती आहे आणि नवीन पिढी व्यापार क्षेत्रात पुढे येत आहे. शहराला जोडणारे रस्ते, रेल्वे व्यवस्था उत्तम आहे. या शहरात विकासाची प्रचंड क्षमता आहे.”पुढे बोलताना त्यांनी बारामतीच्या विकासाचा दाखला देत सांगितले की, “बारामतीत आम्ही शिक्षण संस्था उभ्या केल्या, दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे बाजारपेठ फुलली आहे. काही लोक म्हणतात बारामतीचा विकास आणि इतर शहरांची उपेक्षा हे खरे नाही. मी सर्वांना समान मदत केली आहे. पण निधी योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे तरच शहराचा विकास होतो.”

सर्वांगीण विकासाचे ध्येय

अजित पवार म्हणाले, “सकाळी सहा वाजल्यापासून लोकांच्या अडचणी समजून घेणे, सर्वांना बरोबर घेऊन काम करणे हाच विकासाचा मार्ग आहे. दौंड तालुक्यातील अनेक रस्त्यांसाठी मी निधी दिला आहे. अष्टविनायक मार्गासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च केले जात आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “बारामती आणि दौंड वेगळी नव्हती. तालुक्यात शैक्षणिक संस्था काढल्या, उद्योगांना हातभार लावला. निवडणुकीत राजकारण होते, पण त्यानंतर जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे लागते. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच खरे काम आहे.”

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा आमच्या राजकारणाचा पाया”

अजित पवार यांनी आपल्या भाषणात विचारधारात्मक स्पष्टता दाखवली. ते म्हणाले, “आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे ‘बेरजेचे राजकारण’ पाहिले आहे. आम्ही नेहमी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून पुरोगामी विचार मांडतो. जात, धर्म, नातीगोती यावर राजकारण कधीच केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती व १२ बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तोच आदर्श आपल्या कामाचा असावा.” या कार्यक्रमात पूरग्रस्तांना मदतीचा हात देत स्वप्निल शहा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १,५५,५५५ रुपयांचा धनादेश अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द केला.

Web Title: Deputy chief minister ajit pawar has advised ncp workers in daund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ajit Pawar NCP
  • Daund News

संबंधित बातम्या

Ajit Pawar: “कुणीही मिमिक्री केली तरीही माझ्या अंगाला…”, मिमिक्री प्रकरणावरून अजित पवारांनी राज ठाकरेंना काय उत्तर दिलं?
1

Ajit Pawar: “कुणीही मिमिक्री केली तरीही माझ्या अंगाला…”, मिमिक्री प्रकरणावरून अजित पवारांनी राज ठाकरेंना काय उत्तर दिलं?

Ajit Pawar: “वंचित आदिवासी, गरीब समाजाला…”; अजित पवारांचे ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
2

Ajit Pawar: “वंचित आदिवासी, गरीब समाजाला…”; अजित पवारांचे ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Maharashtra Politics : “हिरव्या सापांना ठेचण्याची भाषा संग्राम जगतापांना भोवली”; अजित पवारांची नाराजी व्यक्त, म्हणाले….
3

Maharashtra Politics : “हिरव्या सापांना ठेचण्याची भाषा संग्राम जगतापांना भोवली”; अजित पवारांची नाराजी व्यक्त, म्हणाले….

अजित पवारांचा भाजपला धक्का! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार; तारीखही ठरली
4

अजित पवारांचा भाजपला धक्का! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार; तारीखही ठरली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pak-Afghan War : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक हल्ला; डझनभर तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा

Pak-Afghan War : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक हल्ला; डझनभर तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा

Oct 18, 2025 | 04:11 PM
बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून सापळा रचून पकडले

बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून सापळा रचून पकडले

Oct 18, 2025 | 04:10 PM
Raigad News: फेक नरेटिव्ह तयार करणारे विरोधक सावध रहा – हसन मुश्रीफ

Raigad News: फेक नरेटिव्ह तयार करणारे विरोधक सावध रहा – हसन मुश्रीफ

Oct 18, 2025 | 04:03 PM
IND vs AUS: ‘रोहित माझ्या नात्यात बदल…’, ODI चे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर शर्माच्या संबंधांवर शुभमन गिलची कबुली 

IND vs AUS: ‘रोहित माझ्या नात्यात बदल…’, ODI चे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर शर्माच्या संबंधांवर शुभमन गिलची कबुली 

Oct 18, 2025 | 03:52 PM
याला म्हणतात बिजनेस माइंड! गुजरातच्या जैन समुदायाने तब्ब्ल 186 गाड्या खरेदी करत वाचवले ‘इतके’ कोटी रुपये

याला म्हणतात बिजनेस माइंड! गुजरातच्या जैन समुदायाने तब्ब्ल 186 गाड्या खरेदी करत वाचवले ‘इतके’ कोटी रुपये

Oct 18, 2025 | 03:50 PM
Pune Crime: कोंढव्यात झटापटीत गांजा तस्करीतील आरोपीचा मृत्यू; मीरा भाईंदर पोलिसांची कारवाई

Pune Crime: कोंढव्यात झटापटीत गांजा तस्करीतील आरोपीचा मृत्यू; मीरा भाईंदर पोलिसांची कारवाई

Oct 18, 2025 | 03:48 PM
Sanjay Gaikwad News: दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन? संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण

Sanjay Gaikwad News: दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन? संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण

Oct 18, 2025 | 03:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
THANE : भाजप बॅनर प्रकरणावर संजय केळकरांचे स्पष्टीकरण

THANE : भाजप बॅनर प्रकरणावर संजय केळकरांचे स्पष्टीकरण

Oct 18, 2025 | 03:10 PM
Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध

Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध

Oct 17, 2025 | 07:08 PM
Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Oct 17, 2025 | 06:54 PM
Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Oct 17, 2025 | 06:46 PM
Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Oct 17, 2025 | 06:38 PM
Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Oct 17, 2025 | 06:30 PM
Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Oct 17, 2025 | 06:24 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.