पिंपरी : प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. हे संपूर्णभारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. हे फक्त श्रीराम मंदिर नसून ती आपली अस्मिता आहे, गेली 500 वर्षांचा असणारा कलंक छातीवरबसून पुसला असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगवी येथे व्यक्त केले.
श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
ज्या ठिकाणी असणारी बाबरी पाडण्यात आली त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामाचे मंदिर उभा राहिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सांगवी येथे आयोजित ‘अटल विनामूल्य महाआरोग्यशिबीर’ दरम्यान ते बोलत होते.
या मान्यवरांची उपस्थिती
यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार अस्विनी जगताप, महेश लांडगे, भीमराव तापकीर, उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर’
जग ‘फास्ट’ होत असताना आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. त्यात दुर्धर रोगाचा उपचार करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडतनाही. आमच्या सरकारने प्रत्येक व्यक्तीला 5 लाख प्रयत्न मोफत उपचार योजना सुरु केली आहे. मात्र आमदार लक्ष्मण जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेला ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर’ हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
दरम्यान दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे आनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यातआले.
रामराज्याचे स्वप्न…
प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
येत्या 22 तारखेला आयोधेत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे. खऱ्या अर्थाने राम राज्य सुरु होणार आहे. याच पध्द्तीनेदेशात, महाराष्ट्रात राम राज्य आणायचे आहे. राम राज्य म्हणजे जिथे पीडित,दलित, वंचित यांचा आवाज ऐकला जातॊ व न्याय दिलाजातो . ते म्हणजे राम राज्य असे फडणवीस म्हणाले.
वाचाळवीरांना प्रभू श्रीरामच बुद्धी देतील…
प्रभू श्रीराम यांच्याबद्दल काही वाचाळवीर नवं नवीन वाद निर्माण करत आहेत. श्रीराम हे बहुजनांचे नेते होते, ते मासांहारी होते. असल्याकाही कुटून तरी अक्कल आणतात. प्रसिद्धीसाठी काही तरी वेड्यासारखे बोलायचे असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेतात्यांच्यावर जोरदार टीका केली. अश्या वाचाळवीरांना प्रभू श्रीरामच बुद्धी देतील असेही फडणवीस म्हणाले.






