मुंबई : आज माघी गणेश जयंती आहे. आज माघी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे. गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओखळलं जातं. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. आज भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसत आहे.
[read_also content=”अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी फोन करून प्रकृतीची केली विचारपूस! https://www.navarashtra.com/movies/mithun-chakraborty-discharge-from-hospital-pm-narendra-modi-called-him-to-ask-about-his-health-nrps-506609.html”]
आज माघी गणेश जयंती निमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राज्यात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये ही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. काही सावर्जनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात. या दिवशी श्रीगणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख-समृद्धी कायम टीकून राहते असं म्हटलं जातं.