Dhananjay Munde Latest News
Dhananjay Munde News marathi : बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तीव्र परिणाम राज्यभर उमटले आहेत. या प्रकरणी वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेराजीनामा सोपवला. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मात्र राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्विट करून राजीनाम्यामागच्या २ कारणांचा खुलासा केला आहे.
वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ह्या कंपनीत राजश्री धनंजाय मुंडे डायरेक्टर आहे. त्या कंपनी चा २०२२ चा रेवन्यू १२ कोटी २७ लाख
२०२२ जी शेवटची भरलेली बैलेंस शीट आहे त्यात देखील वाल्मीक कराड related parties मधे प्रामुख्याने आहेत.
India Cement कंपनी चा Fly Ash देखील हीच कंपनी… pic.twitter.com/fUs3hyc5j9
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 8, 2025
अंजली दमानिया यांनी X या सोशल मीडियावर पोस्ट करत काही कागदपत्रे आणि कंपनीची बॅलेन्स शीट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी दस्तऐवजांच्या आधारे दावा केला की, “वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस” या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत. तसेच या कंपनीच्या आर्थिक व्यवहारात वाल्मिक कराड यांचा मोठा सहभाग असल्याचे ट्विट म्हटलं आहे.
दरम्यान अंजली दमानिया यांनी २०२२ साली भरलेली बॅलेन्स शीट समोर आली. त्यानुसार वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचा एकूण महसूल तब्बल १२ कोटी २७ लाख रुपये आहे. या कंपनीच्या रिलेटेड पार्टी ट्रॅन्झॅक्शनमध्ये वाल्मिक कराड यांचे नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी आणखी एक गंभीर आरोप केला होता की, इंडिया सिमेंट कंपनीचा फ्लाय अॅश वाहतूक करण्याचा करार देखील वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसला मिळाला आहे. याचा अर्थ असा की कंपनीचे व्यवहार आणि जमिनीचे व्यवहारही एकत्र असल्याचा संशय दमानियांनी व्यक्त केला आहे.
अंजली दमानिया यांनी त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट केले होते की, “आतापर्यंत मी जो खुलासा केला आहे तो केवळ एक भाग आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठे आर्थिक व्यवहार आणि जमीन खरेदी-विक्री प्रकरणे उघड करणार आहे.” दमानियांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणि विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया देत, “सरकारमधील मंत्र्यांचे आर्थिक व्यवहार किती गैरमार्गाने चालतात, हे यातून उघड झाले आहे,” असा आरोप केला आहे. तसेच विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत. परंतु, यावेळी त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.