फोटो - सोशल मीडिया)
धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांविरोधात टीकाटिप्पणी केली जात आहे. अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असतानाच आता उमरग्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेदेखील वाचा : मावळवासियांची मकरसंक्रांत झाली गोड! आमदार सुनील शेळकेंच्या प्रयत्नांमुळे वाचणार शेतकऱ्यांचे ७५ कोटी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्याविरोधात जात वैधता प्रमाणपत्रावर याचिका दाखल केली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती दिली जात आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
स्वामींविरोधात इलेक्शन पिटीशनही दाखल
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला होता. त्यांचा हा पराभव जव्हारी लागला होता. आता पराभूत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी या याचिकेसह प्रवीण स्वामी यांच्याविरुद्ध इलेक्शन पिटीशनही दाखल केली आहे. चौगुले यांनी निवडणुकीचे निर्णय आणि तांत्रिक बाबींवर 16 2025 या क्रमांकाची इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे.
स्वामींच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाकडून नोटीस देण्यात आली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने या ठिकाणी प्रवीण स्वामी यांना संधी मिळाली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला होता.
संभाजीनगरमध्ये ठाकरे गटला गळती
संभाजीनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली. नुकतेच माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे सेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. भविष्यात आणखी कोणकोण भाजपच्या तंबूत दाखल होतेय याची उत्सुकता आहे. यामुळे उबाठा गटाची चिंता वाढली आहे.
भाजपने स्वबळावर लढावं; पदाधिकाऱ्यांची इच्छा
मुंबईत महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपने स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, महायुतीने एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जावे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यामुळे महायुतीतही सारे आलबेल आहे का याबाबतही चर्चा सुरु झाली आहे. या सर्वांचा परिणाम संभाजीनगरात दिसून येणार आहे.
हेदेखील वाचा :Ladki Bahin Yojana : तर ६० लाखांहून अधिक लाडक्या बहिणी योजनेतून बाद होतील; राज्यात या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ