मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालातून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे सरकारने कोणताही अतिरिक्त मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार केलेला नव्हता. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कामाचा वेग आणखी वाढवतील असे दिसते आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल, असे म्हटले जात आहे.
सध्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह एकूण 20 मंत्री आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील कमाल संख्या 43 अशी आहे. त्यामुळे आता त्यात आणखी 23 आमदारांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सहा ते सात आणि सरकारमधील सहयोगी भाजपला 16 ते 17 मंत्रिपदे मिळू शकतात, असा अंदाज आहे.
भाजपकडून ‘या’ नावांवर चर्चा सुरु
भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरु आहे. यामध्ये आमदार राजेंद्र राऊत, विजयकुमार देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांची नावे चर्चेत आहेत. तर माढा लोकसभा मतदारसंघ तसेच माळशिरस, माढा, आणि करमाळा या विधानसभेच्या मतदारसंघांमध्येही नावे पुढे येऊ शकतात.
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष
केंद्रात वाहतूकमंत्री असलेल्या नितीन गडकरी यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या सुभाष देशमुख यांच्या नावाचा समावेश होऊ शकतो, असा अंदाज आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी हेदेखील मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.