बुलढाणा: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Samruddhi Highway Accident) 25 प्रवाशांचा मृत्यू होरपळून मृत्यू झालाय. आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा (Vidarbha Travels Bus Accident) अपघात झाला. डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने बसला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसचा फक्त सांगाडा उरला आहे आणि प्रवाशांचा जळून कोळसा झालाय. त्यामुळे आता अपघातात मृत्यू झालेल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए टेस्टिंगचा (DNA Testing) पर्याय उरला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याविषयी माहिती दिली आहे.
मृतदेहांची ओळख पटवण्यासाटी डीएनए टेस्टिंग -फडणवीस
फडणवीस म्हणाले की, बुलढाणा या ठिकाणी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला.या घटनेत मृतदेह जळाले आहेत त्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. कारण जेव्हा बस डिव्हायडरला धडकली त्यानंतर ती उलटली आणि तिने पेट घेतला. बस पेटल्यामुळे डिझेलच्या टाकीचाही स्फोट झाला. प्रवासी होरपळले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर आहे. आम्ही त्याची चौकशी करत आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच मृतदेहांची ओळख पटवण्यासाटी डीएनए टेस्टिंग केलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
कसा झाला अपघात ?
विदर्भ टॅव्हल्सची (Vidharbh Bus Accident) खासगी बस नागपूरहून पुण्याकडे (Pune) निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. मध्यरात्री 1.30 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ बसचा भयंकर अपघात झाला. बस आधी एका खांबाला जावून आदळली आणि त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. डीझेल टाकी फुटल्याने बसने पेट घेतला.
आगीने बघात बघता रौद्ररूप धारण केलं. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. बसमधील 26 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या बसचा एक चालक दगावला आहे. तर दुसरा चालक शेख दानिश शेख इस्माईल हा बचावला आहे. (Buldhana Bus Accident)
दरम्यान आता डीएनए चाचणी करूनच मृतांची ओळख पटवली जाणार आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनीही तपास सुरू केला आहे.