महाराष्ट्र सीएम देवेंद्र फडणवीसांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले (फोटो - सोशल मीडिया)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले असून भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा फडकवला आहे. भारत पुन्हा चॅपियन झाला आहे. आणि काल अनेक रेकॉर्ड तोडत ज्या प्रकारे न्यूझीलंडचा पराभव हा भारतीय संघाने केला, T20 सामन्याच्या इतिहासामध्ये फायनलमध्ये अशाप्रकारचा स्कोर करणं आणि समोरच्या टीमला अशा पद्धतीने गारद करणं हा देखील एक नवीन रेकॉर्ड आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी भारतीय संघाचे कौतुक केले.
हे देखील वाचा : “पत्नीला कानशिलात मारणे क्रूरता नाही…”, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय आहे प्रकरण?
पुढे ते म्हणाले की, “कालच्या मॅचमध्ये विशेषतः संजू सॅमसंग असतील, अभिषेक शर्मा असतील यांनी ज्या प्रकारे बॅंटिग केली त्यामुळे एक अतिशय मजबूत संघटना हे भारताला मिळालं. आणि बॉलिंगमध्येही जसप्रीत बुमराह यांनी ज्याप्रकारे पूर्ण सिरीजमध्ये अतिशय इकॉनॉमिने बॉलिंग केली. आणि कालही त्यांनी ज्या प्रकारे न्यूझीलंडच्या टीमला गारद केलं. विलषण पद्धतीचे त्यांचं कार्य आणि बॉलिंग आपल्याला पहायला मिळाली आहे. अर्थात एकूण टीमचा परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम राहिला आहे. या सिरीजमध्ये केवळ एक सामना आपण हारलो, बाकी कोणत्याच सामन्यामध्ये पराजित झालो नाही. एक खात्रीशीर विजय भारतीय संघाने मिळवून दिला. त्यामुळे सुर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीमचे मी अतिशय अभिनंदन करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
हे देखील वाचा : इशानची गर्लफ्रेंड तर सुर्याची बायको… नजर टाका विश्वचषकाच्या फायनलच्या दिनी खेळाडूंचे परिवारासोबत खास क्षण!
आयसीसी टी20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादव व संपूर्ण टीम इंडियाचे मनःपूर्वक अभिनंदन! आईसीसी टी20 वर्ल्ड कप जीतने पर कप्तान सूर्यकुमार यादव और पूरी टीम इंडिया को हार्दिक बधाई! (मुंबई | 9-3-2026 )@surya_14kumar @Jaspritbumrah93 @BCCI #Maharashtra #Mumbai… pic.twitter.com/hzUzFabZXg — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 9, 2026
फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि म्हटले की, “आज भारताची जागतिक स्थिती पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत आहे. “टॅरिफ वॉर” चा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की जग आर्थिक आणि व्यापारी दबावांना तोंड देत असताना भारत अढळ राहिला. फडणवीस यांच्या मते, पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली आहे, ज्यामुळे देश कोणत्याही आंतरराष्ट्रीय आव्हानाला तोंड देऊ शकतो. त्यांनी विरोधकांची टीका “हास्यास्पद” म्हणून फेटाळून लावली.






