फोटो सौजन्य - सोशल मीडिया
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागावर गेल्या वर्षापासून छत नाही, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाचा आणि पावसाळ्यामध्ये उभे राहायला छत नसल्यामुळे डोंबिवलीकरांना पावसाळ्यात लोकलमध्ये चढताना पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. या संदर्भात मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे शेडच्या काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता रेल्वेने ही बाब निदर्शनास आणून दिलेल्या आमदार राजू पाटील यांना तातडीने शेडचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानक हा रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा स्थानक आहे. दररोज स्टेशनवरून रेल्वेने हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या रेल्वे स्थानकावरील समस्यांकडे रेल्वे प्रशासनाच दुर्लक्ष झालं आहे. फलाट क्रमांक पाचवर छत्रपतीला शिवाजी महाराज टर्मिनल बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागावर सुमारे दीड वर्षापासून छत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना आता लोकलमध्ये चढताना पावसाचा मारा देखील सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षापासून प्रवाशांंकडून, रेल्वे प्रवासी संघटनांकडून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित भागात छत बांधण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांंकडे केली जात होती. या कामासाठी निधी मंजूर देखील आहेत. प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. मात्र आता लवकरच या कामाला सुरुवात करणार असल्याचे रेल्वेने मनसे आमदार राजू पाटील यांना लेखी आश्वासन दिल आहे.
हेदेखील वाचा – Mumbai Half Marathon: मुंबई धावणार, सचिन तेंडुलकरने झेंडा दाखवताच विक्रम मोडणार; 6,200 महिला होणार सहभागी
मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील पाचव्या फलाटावर शेड नसल्याने प्रवाशांचे हाल सुरु आहेत. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाच्या कालखंडात मनसे आमदार प्रमोद(राजू )पाटील यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.यानंतर आता आमदार पाटील यांना रेल्वेने लेखी आश्वासन देऊन लवकरच शेडचं काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.